Wednesday, January 15, 2025

/

आरसीयुकडून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब : रामचंद्रगौडा

 belgaum

21 व्या शतकातील तातडीची गरज लक्षात घेऊन नव्या पिढीला त्यादृष्टीने तयार करणे अत्यावश्यक असल्यामुळे राणी चन्नम्मा विद्यापीठाने (आरसीयू) चालू शैक्षणिक वर्ष 2021 -22 पासून नव्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020’ चा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. रामचंद्रगौडा यांनी दिली.

शहरातील माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयात आज मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कुलगुरु डाॅ. रामचंद्रगौडा म्हणाले की, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करणारे व क्रांती घडविणारे आहे. मानवी मूल्यांना महत्त्व देणारे आणि रोजगाराभिमुख कौशल्यांना प्राधान्य देणाऱ्या या धोरणांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना बीए, बीकाॅम व बीएससी अभ्यासक्रम निवडता येणार आहे.

या अभ्यासक्रमांच्या प्रारंभी एक मेजर एक मायनर किंवा दोन मेजर विषय निवडता येतील. मात्र विद्यार्थ्यांसाठी कन्नड भाषा निवडणे अत्यावश्यक असेल. ज्या विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व अभ्यासक्रमात कन्नड भाषा घेतलेली नाही. ज्यांची मातृभाषा कन्नड नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असणार आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एखाद्या विद्यार्थ्याला स्वतःच्या कॉलेजमधून पदवी मिळणे शक्य नसेल तर तो दुसर्‍या कॉलेजमधून ती पदवी घेऊ शकतो. कॉलेजीसना फोर्थ ईयर ग्रॅज्युएट ओनर्स डिग्री क्लासेस घेण्याची सक्ती असणार नाही. एखादा विद्यार्थ्याला कांही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले असेल तर नंतर त्याला ते शिक्षण पूर्ण करता येईल, असे डाॅ. रामचंद्रगौडा यांनी सांगितले.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचा साचेबंदपणा जाईल. एकाच शाखेच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अडकून पडावे लागणार नाही. बीए किंवा बीकॉम तसेच बीएससी नंतर एक वर्ष ओनर्स म्हणून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट पीएचडी करता येणार आहे. पदव्युत्तर पदवी एक किंवा दोन वर्षाची असेल. चार वर्षाची बॅचलर्स डिग्री घेणारे पदवीधर एक वर्षाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास पात्र असतील.

त्याचप्रमाणे तीन वर्षाची बॅचलर्स डिग्री घेणारे दोन वर्षाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र असतील. याखेरीज सौरचनात्मक लवचिक त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाह सोडून कौशल्याधारित शिक्षणाकडे वळतात येणार आहे. याबाबतचा अभ्यासक्रम तयार असून तो प्रत्येक महाविद्यालयांकडे पाठविला जाणार आहे, असे राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. रामचंद्रगौडा यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.