महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज शुक्रवारी बेंगलोर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सदिच्छा भेट घेऊन उभय राज्यातील पूर परिस्थिती आणि पाणी नियोजनाबाबत चर्चा केली.
देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांची नियुक्ती झाल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बेंगलोर येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीप्रसंगी मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पूर परिस्थिती बाबत त्याप्रमाणे महाराष्ट्र व कर्नाटकातील जलाशयांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा केली
दरम्यान, नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही सदिच्छा भेट घेतली आहे. शुक्रवारी बंगळुरू मुक्कामी पवार मुख्यमंत्री निवासस्थानी बोम्मई यांना भेटले.
बोंम्मई यांनी मुख्यमंत्री पदाचा स्वीकार केल्यानंतर पवार यांना फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या पदाला आदर देत शरद पवार यांनी बंगळुरला येऊन बोंम्मई यांची भेट घेतली. ट्विटरवर पवार यांनी भेटीची माहिती दिली आहे. याप्रसंगी मंत्री मुरुगेश निराणी हेदेखील उपस्थित होते.