राज्यात बेळगावसह ज्या ज्या ठिकाणी मनपा निवडणुका होत आहेत त्या सर्व ठिकाणी भाजपचे कमळ फुलणार आहे.
बेळगाव आणि इतर ठिकाणी भाजपच्या तिकिटावर जास्त संख्येने उमेदवार निवडून येणार असून सत्ता पूर्णपणे भाजपकडे येईल असे उद्गार भाजपचे राज्यअध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी काढले आहेत.
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा एकदा विस्तार केला जाईल. उर्वरित 4 मंत्री पदे भरली जातील. त्यापैकी 1 कलबुर्गीला जाण्याची शक्यता आहे.
अशीही माहीती त्यांनी दिली आहे. महानगरपालिका निवडणुकीत बेळगाव, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी शहरात कमळ सत्तेवर येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावमध्ये आजवर मनपा निवडणूक पक्षीय चिन्हावर झाली नव्हती. यावेळी ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कटील यांनी विश्वास व्यक्त केला असला तरी तो प्रत्यक्षात येणे कठीण आहे. अशी चर्चा त्यांच्या या विधानानंतर ऐकायला मिळाली.