Monday, January 13, 2025

/

हिम्मत असल्यास एमईएसने अधिकृत उमेदवार जाहीर करावेत !

 belgaum

समिती नेते बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत आपले उमेदवार अधिकृत घोषित करण्यास टाळाटाळ करत आहेत, असे म्हणत सर्व मराठी भाषिक उमेदवार एमईएसचेच उमेदवार आहेत, निष्पाप मराठी भाषिकांना भडकवण्याचे काम सुरू आहे.

असा जावई शोध कन्नड रक्षण वेदिकेच्या दीपक गुडगनट्टी याने लावला आहे. बेळगाव शहरात अनेक मराठी भाषिक निवडणूक लढवत आहेत.

सर्व मराठी भाषिकांनी एमईएस उमेदवार असल्याचा खोटा दावा केला आहे. एमईएस निवडणुकीपूर्वी कोणालाही आपला अधिकृत म्हणत नाही. असे विचित्र विधान त्यांनी एका कन्नड न्यूज पोर्टल कडे केले आहे.

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्र काम केले पाहिजे.
आजपर्यंत निकालानंतर एमईएस नेते, निवडून आलेल्या मराठी उमेदवाराला तो आपलाच म्हणत आले आहेत. हा प्रकार बंद झाला पाहिजेत. असेही ते चमत्कारिकरित्या म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.