Monday, November 25, 2024

/

एकाचीच निवड करा बंद लखोट्यातून आणून द्या

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक वॉर्डात एकापेक्षा अधिक मराठी उमेदवारांनी अर्ज भरले असून मराठी उमेदवारांत एकी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंचमंडळ, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या प्रयत्नातून घेतलेल्या निर्णयाची माहिती बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रंगुबाई पॅलेस येथील कार्यालयात बंद लखोट्यातून आणून द्यावी. असे आवाहन बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

खजिनदार प्रकाश मरगाळे व सेक्रेटरी रणजीत पाटील यांच्याकडे बंद लखोट्यातील ही माहिती आणून द्यावी आणि दिनांक 26 ऑगस्ट सायंकाळी चार वाजेपर्यंत निर्णय अंतिम करावा असे आवाहन सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.

प्रत्येक वार्डात अनेक जण इच्छुक आहेत. मात्र मराठी विरुद्ध मराठी असे वातावरण झाले तर मराठीचेच नुकसान होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याला बळकटी आणण्यासाठी महानगर पालिकेवर मराठीचा भगवा झेंडा फडकवणे फार महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्डातून एकच मराठी उमेदवार उभा राहावा.

इतरांनी आपली माघार घ्यावी. यासाठी गल्लीतील पंचमंडळ कार्यकर्त्यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून आपल्या अंतिम एकच नावाची माहिती 26 ऑगस्ट सायंकाळी चार वाजेपर्यंत रंगुबाई पॅलेस येथे आणून द्यावी .असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत अनेक जण नाराज होऊन वेगवेगळ्या भूमिकात जात आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या भूमिकेला मान देऊन एकीने प्रत्येक वॉर्डात एकच मराठी उमेदवार उभा राहावा या दृष्टीने प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या इच्छुकांनी आपले आपले मराठी पण जपण्याचे भान ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.