Sunday, January 5, 2025

/

सामाजीकतेचा ध्यास घेतलेला मराठी चेहरा

 belgaum

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्र 16 मधून निवडणूक लढवणारे कपिल भोसले यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅक्टर हे चिन्ह घेऊन निवडणुकीत उभा असलेला हा चेहरा सामाजीकतेचा ध्यास घेतलेला आहे.

माणुसकी जपणारा,सतत कार्यतत्पर असणारा आणि एक खंबीर नेतृत्व म्हणून पुढे आलेला हा उमेदवार वॉर्डातील जनतेचा कौल मिळवू लागला आहे. कपिल भोसले यांची ओळख करून देण्याची गरजच नाही, त्यांनी अविरतपणे केलेले कार्यच या निवडणुकीत त्यांच्याकडे यशश्री खेचून आणणार आहे.

मोठी पार्श्वभूमी नाही, राजकारण किंवा समाजकारणाचा वारसा नाही. तरीही हा तरुण आणि उमदा कार्यकर्ता जनतेच्या सुख दुःखात आपला माणूस म्हणून धावून जातो. आपला वॉर्ड,आपली गल्ली,आपले शहर त्रासात राहू नये या इच्छेने कार्य करत राहतो. खरंतर निवडणुकीला उभे राहायचे म्हणून कार्य करणारे अनेक दिसतात,कपिल यांचा क्रम वेगळ्या प्रकारात लागतो. त्यांचे काम आहे म्हणून जनतेने त्यांना निवडणूक लढवायला लावली. पैसेवाला, भरपूर खर्च करणारा म्हणून नव्हे तर अडचणीत हाक मारली की धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणून जनता त्यांना मानत आली आहे.
खरंतर कपिल भोसले यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. आपले काम,उद्योग आणि कुटुंब एवढ्यापर्यंत त्यांनाही मर्यादित राहता आले नसते का? स्वतःच्या पोटाची गाठ बांधायची आणि पुढच्या पिढीचा विचार करायचा असे त्यांनाही सहज करता आले असते. पण आपला मराठी माणूस हा ही आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे, तो नडला जाऊ नये आणि कुठे अडलाच तर कुणी त्याचा गैरफायदा घेऊ नये ही त्यांची धारणा आहे.

Kapeel
वेगवेगळ्या सामाजिक कामात त्यांची आघाडी आहे. कोरोनाच्या अतिशय कठीण काळात तर त्यांनी केलेली कामे पाहिली तर एक तरुण आपल्या साथीदारांना घेऊन काय काय करू शकतो याची कल्पना येते. कपिल भोसले यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेले काम फक्त त्यांच्या 16 क्रमांक वॉर्डला नव्हे तर सर्व शहरालाच माहीत झाले आहे.
घराघरात रेशन किट पुरवणे,प्रसंगी तयार अन्न देणे, अडकलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी प्रयत्न, औषध पुरवठा, लसीकरण, प्रतिबंधात्मक औषध फवारणी ही सगळी कामे त्यांनी केली आहेत. महत्वाचे म्हणजे ही कामे करताना निवडणूक लढवायची आहे या विचारांचा लवलेशही त्यांच्या मनात नव्हता हे विशेष.

Kapeel
मला माझ्या माणसांना सन्मानाने उभे करायचे आहे. त्यांचा आवाज बनून त्यांचे हक्क त्यांना मिळवून द्यायचे आहेत. म्हणून मी निवडणुकीला उभारलोय. माझे सर्व मतदार मला प्रचंड बहुमताने निवडून देतील हा विश्वास कायम आहे. असे वॉर्ड क्र 16 चे कपिल भोसले सांगतात तेंव्हा त्यांच्या डोळ्यातील चमक दिसते आणि जनतेच्या कामात स्वतःला झोकून देण्याची प्रबळ इच्छाशक्ती पाहायला मिळते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.