खानापूर युवा समितीच्या वतीने क्रांती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हजारो पत्रे लिहून बेळगाव सीमा प्रश्ना विषयी जाणीव करून देण्याच्या प्रयत्नाला महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबईच्या प्रथम नागरिक शिवसेनेच्या महापौर किशोरीताई पडणेकर यांनीही पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सीमा भागातील 20 लाख मराठी भाषिक नागरिकांना महाराष्ट्रात सामील करा अशी विनंती केली आहे.
पूर्वोत्तर राज्यांतील आसाम आणि मिझोराम मधील वाद लोकसभेत पोचला असताना बेळगाव सीमा प्रश्नी दखल घेण्यासाठी खानापूर युवा समितीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या मोहीम अंतर्गत किशोरीताई यांनी पंतप्रधानांकडे पत्र व्यवहार केला आहे.
बेळगाव मधील मराठी बांधव गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी संघर्ष करत आहेत याची आपण दखल घ्यावी असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान बेळगावात 9 ते 15 आगष्ट च्या दरम्यान 75 हजार हून अधिक पत्रे जाण्याची शक्यता आहे 9 रोजी हजारो पत्रे रवाना झाली आहेत.