Friday, November 22, 2024

/

समितीच्या बालेकिल्ल्यातून लेटर टू पीएम चा शुभारंभ

 belgaum

सीमा लढ्याचे केंद्रबिंदू असलेल्या येळ्ळूर गावातून पंतप्रधानाना पत्र पाठविण्याच्या आंदोलनरुपी कार्यक्रमाचा सीमाभागाचा बालेकिल्ला असणाऱ्या येळ्ळूरमध्ये थाटात शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूरच्या वतीने पंतप्रधानाना सीमावासीयांच्या वतीनं सीमाप्रश्नाची सोडवणूक करावी असा मजकूर लिहून पत्र पाठविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यांना पाठिंबा देत येळ्ळूर विभाग समितीच्या वतीने आवाहन केल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला व प्रत्येक गल्लो गल्लीत पत्रे लिहून 2150 पत्रे समितीकडे सोपविली आहेत.

येळ्ळूर विभाग समितीचा 3000 ते 3500 हजार पत्रे लिहून पाठवायचा उपक्रम आहे. आज सोमवार दि. 9 रोजी सकाळी श्री चांगळेश्वरी मंदिर येथे कार्यक्रम शुभारंभ झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते.प्रास्ताविक प्रकाश अष्टेकर यानी केले.

यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले येळ्ळूर गावचा सीमाप्रश्नासाठी फार मोठा त्याग आहे. येळ्ळूरच्या लढवय्या जनतेने सीमासत्याग्रह केला . महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक लावला त्यानंतर सरकारने फलक काढून टाकला पण येळ्ळूरच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात महाराष्ट्र राज्य येळ्ळूर असे कोरलेलेच आहे .आज अनेक पत्रे लिहून आपली भावना येळ्ळूर वासीयांनी व्यक्त केली आहे. Letter pmo

मध्यवर्ती अध्यक्ष दिपक दळवी यांनी बोलतेवेळी म्हणाले येळ्ळूर मधील हजारो पत्रांची दखल देशाचे पंतप्रधान नक्कीच घेतील. हा लढा आम्ही सीमाप्रश्न सुटेपर्यत चालूच ठेऊ व सीमाप्रश्न सोडवुन घेऊ.यावेळी पोष्ट आॕफिस मध्ये जाऊन सर्वाच्या वतिने पत्रे दाखल करण्यात आली.

या कार्यक्रमाला ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी,कार्याध्यक्ष मनोहर किणेकर,महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे,तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील. ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर.युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलीक.गणेश दड्डीकर. एल आय पाटील. विलास घाडी.दत्ता उघाडे. उदय जाधव वामन पाटील. ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर. सदस्य रूपा पुण्याणावर, मनिषा घाडी. शालन पाटील. सुवर्णा बिजगरकर. वनिता परिट रमेश मेणसे.राकेश परिट.प्रमोद पाटील. राजू डोण्याणावर. जोतिबा चौगुले राकेश परिट. माजी ग्राम पंचायत सदस्य राजु पावले सतिश देसुरकर भोला पाखरे अनंत पाटील शिवाजी कदम. वाय सी ईगळे. प्रकाश घाडी नारायण कानशिंडे गजानन उघाडे. रमेश पाटील.कृष्णा शाहापूरकर. रामदास धुळजी.अनंद मजुकर. तुकाराम टक्केकर चद्रकांत पाटील. बाळकृष्ण पाटील सुरेश पाटील अनिकेत पाटील हेमंत पाटील विठ्ठल पाटील गजानन पाटील. आशोक भातकांडे, विनोद पाटील हणमंत पाटील अनिल मुरकुटे सुभाष पाटील उपस्थित होते. कार्यक्रमचे आभार दुदाप्पा बागेवाडी कार्याध्यक्ष येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती यानी मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.