मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी बेळगाव प्रश्नी मोदींना पत्र लिहिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही 9 आगष्ट क्रांती दिनी पंतप्रधानाना यांना पत्र लिहून सीमा प्रश्न सोडवा अशी विनंती केली आहे.
बेळगाव खानापूर निपाणी या भागातून 50 हजार हुन अधिक पत्रं लिहून सीमा प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा उपक्रम खानापूर युवा समितीने हाती घेतला आहे.9 ते 15 आगष्ट पर्यँत बेळगाव मधून हजारो पत्रे लिहिली जात आहेत या मोहिमेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहभाग नोंदवत पंतप्रधानाना पत्र धाडले आहे.
खानापूर तालुका युवा समितीनं धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आवाहनाला संपूर्ण सीमाभाग व महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.महाराष्ट्रांतील बहुतांश नेते पंतप्रधान पत्रं लिहीत आहेत.वर्षानुवर्षे रेंगाळलेला बाबरी मशिदीचा वाद पंतप्रधानानी सोडवला त्याच प्रमाणे कर्नाटकात डांबलेला सीमा भाग हा मोदी मुक्त करतील असा विश्वास सीमा वासीयांना वाटत आहे.आता तरी बॉल पंतप्रधानांच्या कोर्टात गेला आहे.
जटीलातील जटिल समस्या सोडवण्याची मोदींची खासियत आहे असा दावा त्यांचे समर्थक करतात हाच धागा पकडून थेट पंतप्रधानानाचं सीमावासीयांनी साकडं घातलं आहे हा प्रश्न लवकरात लवकर सुटल्यास सीमा वर्तीय भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
विकास पुरुष मानणाऱ्या मोदींनी बेळगावच्या विकासाला चालना द्यावी असं बेळगावचे समाजमन आशा व्यक्त करत आहे.