ऑफलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. नववी ते बारावी पर्यंतचे क्लास ऑफलाईन अर्थात शाळा आणि कॉलेजमध्ये सुरू झाले. तर विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस पासची व्यवस्था करण्याची सूचना कर्नाटक सरकारकडे आली होती.
परिवहन मंत्री बी श्री रामलू यांनी दिलेल्या आदेशावरून आता या विद्यार्थ्यांना पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कर्नाटक सेवा सिंधू या पोर्टलवर मंगळवारपासून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दराने बस वितरण केले जाणार आहे.
या बस पास साठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. परिवहन खात्याची बैठक घेऊन ऑनलाईन पास वितरण करण्याची सूचना अधिकार्यांना केली आहे .
सेवा सिंधू पोर्टल वर 2021- 22 शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करून आपल्या शाळा आणि महाविद्यालयात पर्यंत जाता येणार आहे.