Wednesday, December 25, 2024

/

खानापूर युवा समितीच्या आवाहनाला कराडमधून प्रतिसाद

 belgaum

बेळगाव,कारवार,निपाणी,भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे.अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले,काहींनी तर आपले बलिदान गेले.सामान्य माराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी,कलाकारांनी आपआपल्या परीने हा प्रश्न सुटावा याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले.

असा हा रक्तरंजित लढा आजतगायत सूरु आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्‍नी मा.पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा याकरिता कराड तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत #letter To PM या मथळ्याखाली पत्र मोहिम राबवत उस्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे ५०० पत्रे मा.पंतप्रधानांना पाठवली.

खानापूर युवा समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती देखील पाठिंबा देत पंतप्रधान यांना पत्रं पाठवण्याचे आवाहन केलं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Karad letter campeign
“सीमाप्रश्न मार्गी लावून ४० लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा.” आशा भावना तरुण तरुणीनी व्यक्त केल्या व कराड तालुक्याच्या वतीने सीमावासीयांना पाठिंबा दर्शविला.

यावेळी वैष्णव काशीद पाटील, धैर्यशील कदम, समर्थ सूर्यवंशी, यश अतकरे, आदिती देशमुख,वैष्णवी जाधव, पल्लवी जायभाये, वैष्णवी सर्वज्ञ यांनी पत्र मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.