बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अर्थात बुडाच्या कणबर्गी येथील निवासी योजनेचे काम येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सुरू होईल, अशी ग्वाही बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांनी दिली आहे.
कणबर्गी येथील निवासी योजनेचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी काल मंगळवारी बुडा कार्यालयात गेलेल्या जमीन मालकांना सोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीत होसमनी बोलत होते. यावेळी बुडा आयुक्त दिनेशकुमार नगर रचना अधिकारी ए. एस. कांबळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. व्ही. हिरेमठ आदी उपस्थित होते.
अनेक अडथळे पार करून निवासी योजना मंजूर करून घेतली आहे. जमीन मालकांनी इतकी वर्षे केलेल्या प्रतिक्षेचे चांगले फळ मिळणार आहे. योजनेच्या आराखड्यात दहा वेळा बदल करावा लागल्याने मंजुरीला विलंब लागला, असे होसमनी यांनी सांगितले.
बी. एस. येडीयुरप्पा मुख्यमंत्री असताना बेंगलोर ठाण मांडून आराखडा मंजूर करून घेतला आहे. हद्द निश्चितीचे काम पूर्ण झाले आहे. आता भूखंड तयार करण्याचे काम सुरू होईल. सर्वप्रथम जमीन मालकांना भूखंड दिले जातील. त्यानंतर शिल्लक भूखंडाची बुडाकडून विक्री होईल, अशी माहितीही गुळाप्पा होसमनी यांनी दिली.
अध्यक्ष होसमनी व आयुक्त दिनेशकुमार यांनी योजनेचा आराखड्याची प्रत मागून विविध आकाराचे भूखंड तयार केले जातील, असे सांगितले या योजनेसाठी कणबर्गी ते बसवन कुडची असा 100 फुटी रस्ता तयार करण्याचे नियोजन असल्याचेही सांगण्यात आले. भूखंड केवळ नकाशावर दिसून येते जमीन मालकांनाही मिळावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.