बेळगावचे जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी आपल्यातील संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन घडविले आहे. एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या कार्यालयात मदत मागण्यासाठी आली होती.
घरात गळती होत आहे आणि सर्व वस्तू घराबाहेर ठेवल्या आहेत.घर कधीही पडू शकते. ही व्यथा मांडल्यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ, मनपाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
बेळगावात गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. पावसाने बरीच आपत्ती निर्माण केली आहे. गणपत गल्लीतील एका घराला गळती लागली आहे. घर कोसळण्याची भीती आहे. एक वृद्ध व्यक्ती आपल्या मुलीसह जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मदत मागण्यासाठी आली होता.
नेमक्या याच वेळी आरोग्य विभागात व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांच्यासह बहुतेक अधिकारी त्यात सहभागी होते.
कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की एक आजी आली आहे. ते लगेच बैठक सोडून बाहेर आले. आजीची समस्या ऐकून त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित तात्पुरती कस्तु बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत.