घरगुती स्वरूपात स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत पंचवीस रुपयांनी वाढली आहे. आता नव्याने सिलेंडर भरून घेण्यासाठी कर्नाटकात 863 रुपये मोजावे लागणार आहेत.
मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा ही वाढ झाली असून 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडर च्या दरात 10 महिन्यात 265 रुपयाने वाढ झाली आहे.
2014 मध्ये गॅस सिलेंडरची किंमत मोदी सरकार येण्यापूर्वी चारशे दहा रुपये होती. गेल्या सात वर्षात दुपटीने वाढ झाली असून काँग्रेसने या वाढीला विरोध दर्शवून आता पुन्हा एकदा जनावरांच्या शेणा पासून बनवलेल्या शेणीचा वापर करून स्वयंपाक करण्याची वेळ या सरकारने आणून दिल्याची टीका केली आहे.
लोकांना थोडा तरी दिलासा द्या लोकांच्या खिशाचा विचार करा आणि कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून तरी दर वाढवा. अशी टीका काँग्रेसने केली आहे .
भारतातील सर्व कुटुंबे स्वयंपाकासाठी चुली ऐवजी आता गॅस वर अवलंबून आहेत.
जास्तीत जास्त घरांमध्ये घरगुती गॅसचा वापर केला जातो. तर घरगुती गॅसच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी आहे. श्रीमंत वर्गालाही गॅस दर परवडू नये इतकी वाढ झाल्याने सध्या नागरिक चिंतेत आहेत.