Saturday, November 16, 2024

/

कुंभ्राळातील ‘त्या’ मुलाला ‘यांनी’ दिला मदतीचा हात

 belgaum

आईचा मृत्यू आणि वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळून असल्यामुळे हलाखीची परिस्थिती ओढवलेल्या कुंभ्राळ (ता. जोयडा) गावातील गणपती गंगाराम पावणे या असहाय्य मुलाच्या मदतीला धावून जाताना बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलने पावणे कुटुंबाला कांही महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे किट आणि शैक्षणिक साहित्य देऊ केले आहे.

जोयडा तालुक्यातील कुंभ्राळ गावात राहणाऱ्या गणपतीच्या आईचे अलीकडेच दुर्धर आजारामुळे निधन झाले असून वडील गंगाराम अर्धांगवायूने अंथरुणाला खिळून आहेत. गणपतीची आजी त्या दोघांचा सांभाळ करत आहे. तिला मिळणाऱ्या 1000 वृद्धापकाळ वेतनावर कसाबसा त्यांचा चरितार्थ चालतो. सध्या दहावीत शिकणाऱ्या गणपतीला पुढे आणखी शिकण्याची खूप इच्छा आहे. परंतु आर्थिक परिस्थिती समोर तो हतबल झाला आहे. घरी दोन वेळचे अन्न मिळणे कठीण असताना शिक्षण कसे घेणार? याची त्याला चिंता आहे. गणपती याची शोकांतिका वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफएस) प्रमुख संतोष दरेकर हे पावणे कुटुंबीयांच्या मदतीला धावून गेले.

फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या दरेकर यांच्यासह अजित कुलकर्णी, राहुल पाटील आदिंनी गणपतीसह त्याची आजी व वडिलांना कांही महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक साहित्याची आणि गणपतीसाठी शैक्षणिक साहित्याची व्यवस्था केली.Fb  friends circle

त्यानंतर रामनगर येथील ‘फेसबूक चे सदस्य अमोल पाटील, वृषभ काळभैरव, श्रीनाथ हावळ, मतीन मकानदार व अक्षय जानवेकर यांनी काल मंगळवारी रात्री बेळगावला येऊन ते साहित्य ताब्यात घेतले. त्यानंतर आज सकाळी रामनगरपासून 15 कि. मी. अंतरावर असणाऱ्या कुंभ्राळ गावात जाऊन ते साहित्य पावणे कुटुंबाकडे सुपूर्द केले.

फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या या उपक्रमासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे एसआयएस नायक यांनी विशेष सहकार्य करण्याबरोबरच प्रशंसाही केली. दरम्यान, गणपती पावणे हा प्रतिभावंत विद्यार्थी असून हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याच्यावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पुढील शिक्षणासाठी त्याला मदतीची गरज आहे. तरी शिक्षण प्रेमी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्याला मदत करावी, असे आवाहन संतोष दरेकर यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.