Saturday, November 16, 2024

/

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे 7,800 कोटींची हानी

 belgaum

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे संकट कोसळलेल्या पूरग्रस्तांच्या खात्यावर नुकसानभरपाई तात्काळ जमा करा. त्यांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक साहित्यासह पाणी, विद्युत आदी सुविधा उपलब्ध करा अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्याबरोबरच जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 7,800 कोटी रुपयांची हानी झाली असल्याची माहिती दिली.

बेळगाव सर्किट हाऊस येथे आज शुक्रवारी कोरोना आणि पूरपरिस्थिती संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. पुनर्वसन कायद्यानुसार पूरग्रस्तांसाठी समर्पक योजना तयार करा. नुकसानग्रस्त गावांमध्ये तात्पुरते शेड उभारून लोकांना निवारा उपलब्ध करून दिला जावा. मागील 2009 -10 साली पुरामुळे कांही गावे स्थलांतरित करून ग्रामस्थांना घरकुल निर्माण करून देण्यात आली होती. त्याचा अभ्यास करून यावेळी पुग्रस्तांना निवारा उपलब्ध करून देण्याची योजना राबवावी असे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

नदीकाठावरील प्रदेशांमध्ये आता पाणी ओसरले असले तरी यापुढे अशा भागातील लोकांना पुराची पूर्वकल्पना देऊन पूर परिस्थिती वर मात करण्यासाठी सरकारच्या आवश्यक उपाययोजना तयार असतात याबाबत जनजागृती केली जावी. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ 10 हजार रुपये आरटीजीएस मदत निधी उपलब्ध करून दिला जावा अशी सूचनाही जिल्हा पालकमंत्री कारजोळ यांनी केली. कोरोना संदर्भात कोणताही हलगर्जीपणा न करता प्रभावी उपचार करण्याची सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. जिल्ह्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल व दवाखान्यांमध्ये स्थानिकांना पॅरामेडिकल प्रशिक्षण प्राधान्याने देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.Covid review

प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिश्वास यांनी यावेळी बोलताना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पूर व्यवस्थापन यंत्रणा राबविली गेली पाहिजे अशी सूचना करून एसीपी व टीसीपी योजनेअंतर्गत पॅरामेडिकल प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती दिली. जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ एस. व्ही. मुन्याळ यांनी बेळगाव जिल्ह्यात 5.59 लाख जणांची कोरोना चांचणी झाली असून सध्या जिल्ह्यात 496 सक्रिय रुग्ण आहेत.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट शेकडा 8.84 टक्के असून कोरोना मृत्यूचा दर शेकडा 2.34 टक्के इतका असल्याचे सांगितले. जिल्ह्यात आत्तापर्यंत 460 ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळून आले असून यापैकी 300 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. याखेरीज ब्लॅक फंगसमुळे 49 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डाॅ. मुन्याळ यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.