लिंगायत स्वामीजींनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण देताना वेगवेगळ्या सवलती देण्यात येतात. मात्र यावेळी बेळगाव येथील एस जी बाळेकुंद्री इंजिनीरिंग कॉलेज या म नि प्र सिद्धरामेश्वर स्वामीजींच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या संस्थेत कोरोनामुळे आईबाप गमावलेल्या मुलांना अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंगचे मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
हा मोठा निर्णय या स्वामीजींच्या शिक्षण संस्थेने घेतला असून सर्व समाजासमोर आदर्श निर्माण करण्यासारखे हे काम आहे.
अनेक समाजांच्या शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र त्या ठिकाणी त्या त्या समाजातील लोकांनाही भरमसाठ शैक्षणिक शुल्क घेऊन प्रवेश दिला जातो.
अखेर शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक जण मागे पडतात. मात्र एस जी बाळेकुंद्री इंजिनीरिंग कॉलेज बेळगाव या संस्थेने कोरोना मध्ये आई आणि वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोफत अभियांत्रिकी शिक्षण देण्याचे ठरवून मोठा आदर्श निर्माण केला आहे.
यावर्षी कोरोनाने हाहाकार माजवला. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मूले शिक्षणाच्या वयात असताना अचानक आई वडिलांचे छत्र हरपले तर पुढील शिक्षण घेणे अवघड जाते.
त्या दृष्टीने निर्माण केलेली ही सोय अनेक विद्यार्थ्यांना महत्त्वाची ठरणार असून अशा विद्यार्थ्यांनी बेळगावच्या एस जी बाळेकुंद्री महाविद्यालयात संपर्क साधून आपले शिक्षण पुढे चालू ठेवणे योग्य ठरणार आहे.