बेक्किनकेरे (ता. बेळगाव) येथील शेतकरी पुंडलिक भावकू डोमले यांच्या शेतात आढळून आलेले फणा काढलेल्या नाग सर्प सदृश्य हातभर लांब रताळे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
गणपत गल्ली, बेक्किनकेरी येथील पुंडलिक डोमले या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतामध्ये रताळ्याचे पीक घेतले आहे.
या पिकाची काढणी सुरू असताना सुमारे दीड-दोन फूट लांबीचे फणा काढलेल्या नाग सापाप्रमाणे दिसणारे लांबसडक रताळे आढळून आले आहे.
वरून पाहता हे रताळे हुबेहूब सापाप्रमाणे दिसत असल्याचे सांगण्यात आले. सदर नागसर्प सदृश्य रताळे सापडलेल्या दिवशी ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. सध्या हे रताळे बेक्किनकेरी गावात चर्चेचा विषय झाले आहे.