बेळगाव महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक आणि महापौर होण्याचा बहुमान मिळवलेल्या सरीता पाटील यांनी यावेळी निवडणुकीतून माघार घेत मराठी भाषिक उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. 40 प्लसचे मिशन साध्य करण्यासाठी ही माघार नसून हे एक पाऊल पुढे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी बेळगावला live शी बोलताना दिली आहे.
आपण निवडून आलो लोकांनी विश्वास दाखवला आणि आपण बरेच काम केलेले आहे. फक्त वॉर्डा पुरते मर्यादित न राहता बेळगाव शहराच्या महापौर या नात्याने संपूर्ण शहरासाठी काम करण्याची संधी नागरिकांनी यापूर्वी दिली. आता मराठी भाषिक उमेदवार निवडून यावा, एकच उमेदवार वॉर्डात असावा आणि जनरल वॉर्ड मधून महानगरपालिकेत 40plus होण्यासाठी हातभार लावावा. यासाठी आपण माघार घेत असल्याचे आणि एक पाऊल पुढे टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या विश्वासावरच आपले काम सुरू आहे.
फक्त स्वतःलाच नव्हे तर आपल्या सासूबाई लता पाटील यांनाही नागरिकांनी मोठ्या मतसंख्येने निवडून दिले होते. त्यांच्यानंतर बिनविरोध निवड करत महानगरपालिकेत सेवा करण्याची संधी नागरिकांनी दिली.
या विश्वासाला पात्र ठरून या पुढील काळातील सामाजिक कार्य सुरू राहणार आहे. जो काही अभ्यास झालेला आहे ,जी काही माहिती मिळविली आहे त्याचा निवडून आलेल्या उमेदवाराला उपयोग होईलच. त्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे आहे असे त्यांनी सांगितले.