उमेदवारी अर्ज दाखल करताना गर्दी -गोंधळ होऊ नये, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी यासाठी विविध ठिकाणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रातील अधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे काटेकोर पालन करीत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना दिली.
. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरात महापालिका मुख्य कार्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये 12 ठिकाणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या संदर्भातील तपशील खालील प्रमाणे आहे.
प्रभाग क्र. 1, 2, 5, 6, 8 -महापालिका महसूल विभागीय कार्यालय उत्तर -1 कोनवाळ गल्ली. प्रभाग क्र. 3, 4, 7, 9, 10 -मनपाचे समुदाय भवन कोनवाळ गल्ली. प्रभाग क्र. 11, 36, 47 -महापालिका मुख्य कार्यालयातील उत्तर आमदारांचा कक्ष. प्रभाग क्र. 12, 13, 20, 37, 47 -महापालिका महसूल विभागीय कार्यालय अशोकनगर. प्रभाग क्र. 14, 35, 38, 48, 55 -महापालिका उपमहापौर कक्ष. प्रभाग क्र. 15, 16, 22, 23, 24 -महापालिका पीडब्ल्यूडी विभागीय कार्यालय उत्तर -1 कोनवाळ गल्ली. प्रभाग क्र. 17, 31, 32, 33, 34 -महापालिका मुख्य कार्यालय यमकनमर्डी आमदारांचा कक्ष. प्रभाग क्र. 18, 19, 25, 26, 45 -महापालिका विभागीय कार्यालय उत्तर -2 विश्वेश्वरय्यानगर. प्रभाग क्र. 21, 27, 28, 39, 56 महापालिका पीडब्ल्यूडी विभागीय कार्यालय दक्षिण -1 गोवावेस संकुल. प्रभाग क्र. 29, 30, 42, 43, 44 -महापालिका पीडब्ल्यूडी विभागीय कार्यालय दक्षिण -2 गोवावेस संकुल. प्रभाग क्र. 40, 41, 49, 50, 51 -महापालिका महसूल विभागीय कार्यालय दक्षिण -1 गोवावेस संकुल. प्रभाग क्र. 52, 53, 54, 57, 58 -महापालिका महसूल कार्यालय दक्षिण -1 गोवावेस संकुल.