कर्नाटक राज्यातील सर्व 224 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार याद्या आणि संबंधित कागदपत्रे भाषिक अल्पसंख्यांकांच्या सोयीसाठी त्यांच्या भाषेत उपलब्ध करण्याचा आदेश भारतीय निवडणूक आयोगाच्या शिफारसी वरून माननीय राष्ट्रपतींनी गेल्या 19 फेब्रुवारी 2008 रोजी काढला आहे. या आदेशानुसार कर्नाटकातील प्रदेश आणि भाषा यांचा तपशील अनुक्रमे मतदार संघ क्रमांक, नांव आणि भाषा यानुसार खालील प्रमाणे आहे.
ए) 1. निपाणी -कन्नड आणि मराठी, 2. चिक्कोडी सदलगा -कन्नड आणि मराठी, 11. बेळगाव उत्तर -कन्नड आणि मराठी, 12. बेळगाव दक्षिण -कन्नड आणि मराठी, 13. बेळगाव ग्रामीण -कन्नड आणि मराठी, 14. खानापूर -कन्नड आणि मराठी, 47. बसवकल्याण -कन्नड आणि मराठी, 51. भालकी -कन्नड आणि मराठी, 52. औराद (एससी) -कन्नड आणि मराठी, 76. हल्याळ -कन्नड आणि मराठी, 77. कारवार -कन्नड आणि मराठी.
बी) 44. गुलबर्गा दक्षिण -कन्नड आणि उर्दू, 47. गुलबर्गा उत्तर- कन्नड आणि उर्दू.
सी) 146. कोलार गोल्ड फील्ड् (एससी) -कन्नड आणि इंग्रजी, 154. राजेश्वरीनगर -कन्नड आणि इंग्रजी, 156. महालक्ष्मी लेआउट -कन्नड आणि इंग्रजी, 157. मल्लेश्वरम -कन्नड आणि इंग्रजी, 154. पुलकेशीनगर (एससी) -कन्नड आणि इंग्रजी, 160. सर्वज्ञनगर -कन्नड आणि इंग्रजी, 161. सीव्ही रामननगर (एससी) -कन्नड आणि इंग्रजी, 162. शिवाजीनगर -कन्नड आणि इंग्रजी, 163. शांतीनगर -कन्नड आणि इंग्रजी, 165. राजाजीनगर -कन्नड आणि इंग्रजी, 166. गोविंदराजनगर -कन्नड आणि इंग्रजी, 167. विजयनगर -कन्नड आणि इंग्रजी, 168. चामराजपेठ -कन्नड आणि इंग्रजी, 169. चिक्कपेठ -कन्नड आणि इंग्रजी, 170. बसवनागुडी -कन्नड आणि इंग्रजी, 173. जयनगर -कन्नड आणि इंग्रजी. राज्यातील उर्वरित सर्व मतदार संघ -कन्नड. भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव रित्विक पांडे यांच्या स्वाक्षरीने उपरोक्त यादी जाहीर करण्यात आली आहे.