सध्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अनेकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता सर्वत्रच निवडणुकीची चर्चा आणि धुरळा उडत आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर हेमुकलानी चौक येथे करणी बाधेचा पाणउतारा करून ठेवण्यात आल्याने एकच चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करनी बाधेची पिडा उतरून टाकण्यात आली आहे? का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
निवडणुकीमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यासाठी इच्छुक काय करतील याचा नेम नाही. बऱ्याच वेळा खुन ही झाले आहेत तर आता करणी बाधा ही याला अपवाद नाही. त्यामुळे याबाबत गांभीर्याने पोलिसांनी चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज मध्ये ज्या व्यक्तीने ही करणी बाधा केली आहे, त्याचा शोध घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
करनी बाधेचा उतारा करून ठेवण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. हा उतारा कोणत्यातरी इच्छुकाला पाडण्यासाठी अथवा जिंकण्यासाठी करून ठेवण्यात आला आहे का याचे नेमके कारण काय आहे? कारण बऱ्याच वेळा अमावस्या व पौर्णिमेच्या दरम्यान हा करणी बाधेचा उतारा ठेवला जातो. रक्षाबंधन नारळी पौर्णिमा असल्यामुळे हा करणी बाधेचा उतारा करून ठेवण्यात आले आहे की आणखी काही अशी चर्चा जोरदार सुरू आहे.
आजच्या आधुनिक युगात अजूनही नागरिक करनी बाधेकडे वळतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. हेमु कलानी चौकात हा करणी बाधेचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन बाहुल्या त्यामध्ये पीना टोचण्यात आले आहेत. लिंबु, अन्नामध्ये गुलाल याचबरोबर इतर काही साहित्य या करणी बाधेच्या प्रकारात आढळून आले आहेत.
दरम्यान ज्या ठिकाणी हा प्रकार करण्यात आला आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याने ज्याने कोणी हा प्रकार केला आहे त्यांचा लवकरच शोध घेण्यात येईल असे जाणकारांना सांगण्यात येत आहे.
दरम्यान नेमका करणीबाधेचा उतारा कोणासाठी असा प्रश्न गंभीर बनत चालला असून या प्रकारांपासून नागरिकांनी शहाणे होण्याची गरज आता व्यक्त करण्यात येत आहे.