Tuesday, December 24, 2024

/

येत्या सोमवारी ठरणार मनपा निवडणुकीचे भवितव्य!

 belgaum

मनपा निवडणुकीचे भवितव्य ठरणार सोमवारी-मनपा निवडणूकीवर संकट कायम असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते.एकीकडे राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. बेळगाव जिल्हा आणि मनपा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

सोमवारपासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर दुसरीकडे निवडणूक निर्णयाच्या न्यायालयीन वादावरही सोमवारीच निर्णय होणार आहे. एकूणच मनपा निवडणुकीचे भवितव्य सोमवारी निश्चित होणार आहे.

बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना आणि नवे वॉर्डनिहाय आरक्षण या मुद्द्यावर कर्नाटक उच्च न्यायालयातील दावा अद्याप सुरू आहे. हा दावा दाखल केलेल्या माजी नगरसेवकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक जाहीर करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेतला असल्याचा आरोप करून याविरोधात मेमो देण्यात आला आहे. अशी माहिती दावेकर्त्यांनी दिली आहे.यामुळे निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती येण्याची दाट शक्यता असून संकट कायम आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात 6 तारखेला सुनावणी होती.यावेळी
निवडणूक आयोगाचे वकील फनिद्र यांनी फायनल हियरिंग ची तारीख वाढवून मागितली.सन्माननीय न्यायालयाने याची तारीख 16 तारखेला दिली मात्र ही सुनावणी होण्यापूर्वीच घाईगडबडीने निवडणूकप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.16 तारखेला अंतिम निर्णय होण्यापूर्वी केलेला हा प्रकार चुकीचा असून त्याविरोधात मेमो घालण्यात आला आहे अशी माहिती या प्रकरणातील प्रमुख दावेदार धनराज गवळी यांनी दिली.

स्वतः धनराज गवळी,भैरगौडा पाटील, नीतीन जाधव व इतर 10 जण याप्रकरणी न्यायालयात गेले असून
आता हे प्रकरण निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणार की काय? हा प्रश्न कायम आहे. न्यायालय जो निकाल देईल त्यावर निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.
दुसरीकडे निवडणूक घेण्याला नागरिकांनीही जोरदार विरोध केला असून तशी निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहेत. कोविड च्या नियमाखाली गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या प्रशासनाने निवडणुकीला कशी परवानगी दिली असा सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे.

दरम्यान राज्य सरकारने बंगळुरू हाय कोर्ट ला घातलेल्या अर्जाची सुनावणी 16 सप्टेंबर रोजी एक महिना उशिरा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.