बेळगाव महानगरपालिका निवडणूक होणार की नाही याचा सोमवारी अंतिम निर्णय होणार आहे.तरीही राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सर्व प्रकारची तयारी करत आहेत.
पक्षाचे कार्यकर्ते आणि इच्छूक कामाला लागले आहेत. भाजप पाठोपाठ काँग्रेस पक्षानेही निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस चे नेते या निवडणुकीत सहभागी होऊन आपले उमेदवार कसे मोठ्या संख्येने निवडून आले जातील याच्या तयारीत लागले आहेत. माजी मंत्री एम.बी.पाटील यांनी काँग्रेसने बेळगाव शहर जिल्हाध्यक्षांना पक्षाच्या चिन्हावर निवडणुका घेण्याचे अधिकृत निर्देश जारी केले आहेत.मात्र यावर बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांची काय प्रतिक्रिया येते याकडेही लक्ष असणार आहे.
निवडणूक अधिकारी असलेले जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ शनिवारी दुपारी 4 वाजता बेळगाव मनपात पत्रकार परिषद घेणार आहेत.
संपूर्ण वॉर्डांसाठी बेळगाव महानगरपालिका निवडणूक होणार आहे आणि राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी करत आहेत.यामुळे यापूर्वी कन्नड, मराठी आणि उर्दू या तीनच गटात होणारी निवडणूक आता पक्षीय राजकारणात विभागली जाणार आहे.