कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असले तरी यावरून अद्याप गदारोळ सुरूच आहे. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अनेक आमदार नाराजी व्यक्त करत आहेत .
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या असंतुष्ट आमदारांची गुप्त बैठक आमदार रमेश जारकीहोळी यांच्या निवास स्थानी पार पडल्याचे समजते .
काँग्रेस -धजदमधून भाजप मध्ये आलेले आमदार या बैठकीला उपस्थित होते .मंत्रीपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करून बैठकीत पुढील दिशा काय असावी यावर चर्चा झाल्याचे समजते.
अश्लील साडी प्रकरणात रमेश जारकीहोळी अडकल्याने यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता .ते या प्रकरणातून आपली निर्दोष मुक्तता होण्याची प्रतिक्षा करीत आहेत .
परंतु तोपर्यंत भालचंद्र जारकीहोळी यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी त्यांनी पक्षासमोर ठेवली होती परंतु दोन्ही जारकीहोळी बंधू कडे दुर्लक्ष करून त्यांना मंत्रिमंडळापासून बाहेर ठेवण्यात आले .त्यामुळे असंतुष्ट आमदारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.