कर्नाटक राज्याचे नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिल्ली दौरा आटोपून राज्यात परतले असून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.बोंम्मई यांनी दिल्ली मुक्कामी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे.
बोम्मई मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी दिली जाईल याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे.आगामी बुधवारी 4 आगष्ट किंवा गुरुवार 5 रोजी नूतन मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात तीन उपमुख्यमंत्री यांच्यासह 19 आमदारांना शपथ दिली जाणार असून उरलेल्याना काहीं दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळात सहभागी केले जाणार आहे.
बंगळुरू मंगळुरू भागांत वाढत्या कोरोनासाठी तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ अस्तित्वात असणे गरजेचे आहे सोबतीला इतर मंत्री असले की मुख्यमंत्री बोम्मई राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात दौरा करण्यासाठी मदत मिळणार आहे यासाठी आगामी तीन ते चार दिवसात हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात यांचा समावेश होऊ शकतो ती यादी खालील प्रमाणे आहे.यात आर. अशोक, बी.श्रीरामलु व गोविंद कारजोळ या तिघांना उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार आहे तर अन्य 19 आमदारांना मंत्रिपद देण्यात आहे.
या मध्ये अश्वत्थ नारायण , सी.पी. योगेश्वर, बसनगौडा पाटील यत्नाळ,एम.ए.रामदास, एम. पी. रेणुकाचार्य, उमेश कत्ती, मुनीरत्न, राजूगौडा, सुनिल कुमार, के.पौर्णिमा,अरविंद लिंबावळी, के.एस.ईश्वरप्पा , आप्पाचु रंजन, मुरगेश निरानी, सतिश रेड्डी, भैरती बसवराज, एम.पी.कुमार स्वामी,कुमार बंगारप्पा व मधुस्वामी आदींचा बसवराज बोम्माई यांच्या मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याची शक्यता आहे.