शारदोत्सव हा बेळगावची संस्कृती दाखवून देणारा आणि महिलांनी अनेक वर्षे चालवलेला एक महोत्सव म्हणून ओळखला जातो.
यावर्षी 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान बेळगावात शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शारदोत्सवाचे उद्घाटन व सुवर्ण शारदा या स्मरणिकेचे प्रकाशन डॉक्टर प्राची जावडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती शारदोत्सव महिला सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी शानभाग यांनी दिली आहे.
शारदोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत, या वर्षीच्या शारदोत्सव संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर्षी डॉ. उर्मिला जोशी, वासंती जोशी, आरती जाधव यांची व्याख्याने होणार आहेत. सोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमही असणार आहेत.
पाचव्या दिवशी रंगमंचीय स्पर्धेमध्ये उखाणा स्पर्धा घेण्यात येणार आहे.यावर्षी विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. याची माहिती बैठकीत देण्यात आली. रंग नाविन्याचे, रंग मधुबनी,करूया अनोखा साजशृंगार, घे भरारी विचारांची ही बौद्धिक स्पर्धा, संगीता सवे योग तालबद्ध योगाचे सादरीकरण, उखाणे नव्या नवलाईचे ही रंगमंचीय स्पर्धा, शोध खजिना या स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धकांनी मेघा देशपांडे, डॉ. संजीवनी खंडागळे, माधवी बापट, निर्मला कळ्ळीमनी,प्रा. अरुणा नाईक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.