बेळगाव महानगरपालिकेची निवडणुक 3 सप्टेंबर रोजी होणार आहे. नागरिक 58 वॉर्डांसाठी आपलर प्रतिनिधि निवडणार आहेत, दरम्यान अद्याप एकाही वॉर्डातून कुणीही निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पुढे आलेले नाही.
16 ऑगस्ट रोजी नामांकन प्रक्रिया सुरू झाली परंतु दुसऱ्या दिवशीही अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
राजकीय पक्षांनी अद्याप आपले उमेदवार निश्चित केले नाहीत तर इच्छुक नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले थकबाकी प्रमाणपत्र इत्यादी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यंदा प्रथमच ही निवडणूक राष्ट्रीय पक्षाच्या सहभागाने गाजणार आहे.बडे पक्ष उघडपणे रिंगणात उतरण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.
आप हा पक्ष देखील या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. आणि सूत्रांनी सांगितले की त्यांनी 36 उमेदवार आधीच निवडले आहेत.
एआयएमआयएम या वेळी एन्ट्री करण्याचा विचार करत आहे.
वर्षानुवर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेहमीच इतर कोणत्याही गोष्टीऐवजी भाषेच्या घटकावर अवलंबून होत्या.
या वेळी मतदारांना उमेदवारांच्या पुढे पक्षाची चिन्हे दिसणे नवीन असेल.
नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख: 23/08/2021
नामांकनांची छाननी: 24/08/2021
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख: 26/08/2021