बेळगाव जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचे प्रकार मोठ्याप्रमाणात घडत आहेत. बँक को ऑपरेटिव सोसायटी एटीएम आणि इतर माध्यमातून नागरिकांना फोन करून फसवणूक करण्याचे प्रकार बेळगाव पोलीस दलाच्या निदर्शनाला आले आहेत.
हे घोटाळे आणि फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आता बेळगाव पोलिस फ्रंट फूट वर आले आहेत. बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी बेळगाव आणि परिसरातील तीस महत्त्वाच्या बँका आर्थिक संस्था यांची एक बैठक घेऊन सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
एखाद्या वेळी फसवणूक झाल्यास लवकरात लवकर लुटली गेलेली रक्कम परत मिळण्याच्या दृष्टीने काय करता येईल या संदर्भातील माहिती बँकांना देण्यात आली असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर तक्रार केल्यास ती रक्कम परत मिळू शकते या संदर्भातील मार्गदर्शन पोलीस दलाने केले आहे.
सीईएन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बि. आर .गडेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सायबर गुन्हेगारी प्रकरणे रोखण्यात आली. याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
बँकांना सिक्युरिटी ऑडिट आणि फायर सेफ्टी ऑडिट करण्याची प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले असून गोपनीय माहिती सायबर गुन्हेगारांना मिळू नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती देण्यात आली आहे त्यासाठी बेळगाव पोलिसांनी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद ठरत आहे.
जागृती होत असली तरी नागरिकांना सतर्क राहावे लागणार असून फसवणुकीचा नंबर आला तर तो न उचलता बळी न पडता सुरक्षित राहण्याचे आवाहनही पोलीस दलाने केले आहे.