Friday, January 17, 2025

/

दिल्लीच्या धर्तीवर बेळगावच्या गल्ली गल्लीत विकास : आप

 belgaum

दिल्लीच्या धर्तीवर बेळगावच्या गल्ली गल्लीत विकास करू असे आश्वासन आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या तोंडावर दिले आहे. मंगळवारी बेळगावात  पत्रकार परिषद घेऊन आप नेत्यांनी आपला निवडणूकनामा जाहीर केला आहे.

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक यावेळी जरा जास्तच चुरशीची ठरू लागली आहे. काँग्रेस, भाजप, जेडीएस अशा राष्ट्रीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेस-भाजप या दोन पक्षांच्या भांडणात आपला फायदा करण्याचा निर्धार आपने केला आहे.

यंदा बेळगाव महानगरपालिकेच्या ५८ प्रभागांपैकी २८ प्रभागात आम आदमी पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. मंगळवारी पक्षाच्या नेत्यांनी मनपा निवडणुकीचा आपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
प्रत्येक कुटुंबाला २० हजार लिटरपर्यंत मोफत पाणी देऊ, गरीब विध्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देऊ अशा घोषणा करण्याबरोबरच दर्जेदार रस्ते, अखंड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन तसेच अनेक अन्य आश्वासनेही आपने दिली आहेत.

आपच्या सत्तेत देशाची राजधानी दिल्लीचा जसा सर्वांगीण विकास झाला तसा विकास बेळगावच्या गल्ली गल्लीत करू असे आपचे नेते लक्ष्मीकांत राव यांनी पत्रकारांना सांगितले.
भाजप-काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समिती, जेडीएसच्या भांडणात प्रथमच बेळगाव मनपा निवडणूक लढविणाऱ्या आम आदमी पक्षाला आपला करिष्मा पाडवता येणार का? बेळगावकर त्यांना जवळ करणार का? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.