Thursday, December 12, 2024

/

हे आहेत बेळगाव मनपा निवडणूक रिंगणातील उमेदवार

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेच्या येत्या 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी तब्बल 385 उमेदवार रिंगणात असून यामध्ये काँग्रेसच्या 45 आणि भाजपच्या 55 उमेदवारांचा समावेश आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वाधिक 19 उमेदवार आणि त्या खालोखाल प्रभाग क्रमांक 37 मध्ये 13 उमेदवार उभे आहेत. त्याचप्रमाणे सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी दोन उमेदवार प्रभाग क्र. 21 व 26 मधून निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक रिंगणातील एकूण 385 उमेदवारांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 45, भारतीय जनता पक्षाच्या 55, निधर्मी जनता दलाच्या 11, आप 27, उत्तम प्रजाकिय पक्ष 1, एआयएमआयएम 7, एसडीपीआय 1 आणि अपक्ष 238 उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीचे मतदान येत्या 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे.

कोणत्या वार्डात कश्या आहेत लढती पहा खालील तक्ता

बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 385 उमेदवार असल्यामुळे प्रभाग क्र. 21 व 26 वगळता सर्वच प्रभागांमध्ये बहुरंगी लढत होणार आहे. यामध्ये प्रभाग क्र. 4 मधून सर्वाधिक म्हणजे तब्बल 20 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणूक रिंगणातील प्रभागवार उमेदवार अनुक्रमे नांव आणि पक्ष यानुसार पुढीलप्रमाणे आहेत. प्रभाग क्र. 1 : उषा सतीश चव्हाण (भाजप), जोयाक्तर अस्लम डोणी (एमआयएम), अकिरा मुल्ला (अपक्ष), तेजश्री निंगाप्पा बाळेकुंद्री (अपक्ष), मनश्री मुतकेकर (अपक्ष), रूपा बोबाटी (अपक्ष), श्वेता रोहन उरणकर (अपक्ष). प्रभाग क्र. 2 : मुजम्मिल डोणी (राष्ट्रीय काँग्रेस), स्नेहा शिवराज सौदागर (भाजप), आदिल मुनीर अहमद बागलकोटी (आम आदमी), मुस्ताक शफी अहमद तहसीलदार (एमआयएम), जियाउद्दिन डांगे (अपक्ष). प्रभाग क्र. 3 : ज्योती कडोलकर (राष्ट्रीय काँग्रेस), किशोरी हलगेकर (भाजप) विजयालक्ष्मी मरकट्टी (आम आदमी), गीता तहसीलदार (अपक्ष), मिना रायमन वाझ (अपक्ष). प्रभाग क्र. 4 : जयतीर्थ व्यंकटेश सौंदत्ती (भाजप), लक्ष्मण अर्जुन बुरूड (काँग्रेस), अमित जाधव (आम आदमी), अंकुश केसरकर (अपक्ष), कपिल नारळीकर (अपक्ष), रमेश महारुद्रप्पा कळसण्णावर (अपक्ष), संजय किल्लेकर (अपक्ष), परशुराम शंकर केरवाडकर (अपक्ष), गणेश गोपाळ नंदगडकर (अपक्ष), प्रभाकर गुंडू काकतीकर (अपक्ष), प्रशांत बसरीकट्टी (अपक्ष), बळवंत शिंदोळकर (अपक्ष), शिवाजी भावकाण्णा बाडीवाले (अपक्ष), शिवाजी मेणसे (अपक्ष), रायमन संतान वाझ (अपक्ष), विनायक बेळगावकर (अपक्ष), विनोद कडोलकर (अपक्ष), सुरज केलगेरी (अपक्ष), हेमंत शिंदे (अपक्ष). प्रभाग क्र. 5 : आफ्रिजा मुल्ला (काँग्रेस), अंजना नारायण उप्पार (भाजप), मंजुळा जाधव (अपक्ष), अनिता नाईक (अपक्ष), परवीन बुखारी (अपक्ष), विना विनय हावळ (अपक्ष). प्रभाग क्र. 6 : मोहम्मद रसूल पिरजादे (काँग्रेस), संतोष पेडणेकर (भाजप), अब्दुल हुसेन बागेवाडी (आम आदमी), अत्ताऊल्ला देवडी (अपक्ष), मुजम्मिल हकीम (अपक्ष), सचिन काकडे (अपक्ष). प्रभाग क्र. 7 : सौरभ सावंत (भाजप), महावीर अनगोळ (आम आदमी), दिगंबर कातकर (अपक्ष), परेश शिंदे (अपक्ष), शंकर पाटील (अपक्ष), प्रणय शेट्टी (अपक्ष), मोतेश बारदेशकर (अपक्ष), संदीप सुभाष चौगुले (अपक्ष). प्रभाग क्र. 8 : ज्योतिबा नाईक (भाजप), मोहम्मद सोहेल संगोळ्ळी (काँग्रेस), अमर येळ्ळूरकर (अपक्ष). प्रभाग क्र. 9 : सारिका खटावकर (भाजप), उषा विजय कल्याणपूरकर (अपक्ष), पूजा इंद्रजीत पाटील (अपक्ष), मनीषा देवकर (अपक्ष). प्रभाग क्र. 10 ज्योती शेट्टी (भाजप), आशालता उर्फ राजश्री लोहार (आम आदमी), अनिता किटवाडकर (अपक्ष), विशाली भातकांडे (अपक्ष).

प्रभाग क्र. 11 : गजानन मिसाळे (भाजप), समीउल्ला माडीवाले (काँग्रेस), चिदानंद जकाते (आम आदमी), गणेश पुराणिक (अपक्ष), आरती गोणी (अपक्ष), चन्नबसप्पा बसवनप्पा बागेवाडी (अपक्ष), राजू रामा ससाने (अपक्ष), अशोक बाबुराव तळ्ळूर (अपक्ष), सतीश नागेश देवरपाटील (अपक्ष). प्रभाग क्र. 12 : तौसिफ पठाण (काँग्रेस), जैनुलाबद्दिन कडोली (एसडीपीआय), मोसिन बार्गीर (आम आदमी), मुसुदआलम सनदी (एमआयएम), अखीला पठाण (अपक्ष), मोहम्मद सादिक इनामदार (अपक्ष), गौससाब हवालदार (अपक्ष) जयश्री माळगी (अपक्ष) मोदीनसाब मतवाले (अपक्ष). प्रभाग क्र. 13 : नागवेणी शिंदे (अपक्ष), रेश्मा भैरकादार (काँग्रेस), सीमा इनामदार (जेडीएस), शमीम येरगट्टी (आम आदमी), अखीला पठाण (अपक्ष), अलमास मतवाले (अपक्ष), मीनाक्षी चिगरे (अपक्ष), रविता रेडेकर (अपक्ष), संगीता बावडेकर (अपक्ष), स्वाती चारुदत्त केरकर (अपक्ष). प्रभाग क्र. 14 : निखिल मरकुटे (भाजप), किसन गणपत मंडोळकर (अपक्ष), मल्लेश बडमंजी (अपक्ष), विनोद मारगनकोप्प (अपक्ष), शिवाजी मंडोळकर (अपक्ष). प्रभाग क्र. 15 : नेत्रावती विनोद भागवत (भाजप), राजश्री रामकृष्ण काकतीकर (अपक्ष), लक्ष्मी वसंत पाटील (अपक्ष), शितल दत्तूसिंग नागरकर (अपक्ष). प्रभाग क्र. 16 : राजू शिवाजी भातकांडे (भाजप), संजय रजपूत (काँग्रेस), कपिल रमेश भोसले (अपक्ष), गणेश महेश दड्डीकर (अपक्ष), विजय सिद्धाप्पा बेळगावकर (अपक्ष) सतीश मार्दोळकर (अपक्ष), सुवर्णा अनिल खटावकर (अपक्ष), प्रभाग क्र. 17 : सविता जयपाल कांबळे (भाजप), सरोजीनी गुणीगोळ (काँग्रेस), कुमुदिनी भैरण्णावर (आम आदमी), गौरम्मा नागाप्पा राव (अपक्ष), चंद्रकला कांबळे (अपक्ष). प्रभाग क्र. 18 : अब्दुल फिवाळे (काँग्रेस), अब्दुल हमीद दस्तगीर चाँदशावाले (जनता दल), राहुल बडसकर (भाजप), शाहिदखान गौसखान पठाण (एमआयएम), सुनील हनुमंत जाधव (आम आदमी), गुंडू कोकडे (अपक्ष), दीपक बसवानी शेट्टी (अपक्ष), मारुती शेटप्पा बडसकर (अपक्ष), विश्वनाथ ज्योतिबा पाटील (अपक्ष), शिवा लिंबाजी चौगुले (अपक्ष), अंजुम शेख (अपक्ष), संतोष शंकर जंतीकट्टी (अपक्ष). प्रभाग क्र. 19 : प्रवीण पाटील (भाजप) सलमान मोहम्मद उमर बागेवाडी (काँग्रेस), अब्दुल रहमान संनदी (आम आदमी) सौरभ सतीश पाटोळे (अपक्ष), बाबू मुल्ला (अपक्ष), मंजुळा भिंगे (अपक्ष), रियाज अहमद किल्लेदार (अपक्ष), शिवानंद मुरगोड (अपक्ष), विवेक शामराव बस्के (अपक्ष), सय्यद साबील पिरजादे (अपक्ष).

प्रभाग क्र. 20 : लता पाटील (भाजप), शकीला मुल्ला (काँग्रेस), सीमा सय्यद (एमआयएम), हजरा अख्तार (अपक्ष), अश्विनी कटारे (अपक्ष), गुलजार बानो मुल्ला (अपक्ष). प्रभाग क्र. 21 प्रीती कामकर (भाजप), सरला सागर सातपुते (काँग्रेस). प्रभाग क्र. 22 : सलीम खतालसाब सनदी (काँग्रेस), रविराज बाळकृष्ण सांबरेकर (भाजप) कविता दीपक कोले (अपक्ष), शाम रामचंद्र कडुचकर (अपक्ष), राजेश सोमनाथ पाटील (अपक्ष), राजेंद्र शिवाजी बिर्जे (अपक्ष), भरतेश बाबू तलवार (अपक्ष), सुरज किरण जाधव (अपक्ष). प्रभाग क्र. 23 : अत्तू भोपाल (काँग्रेस), जयवंत बाळकृष्ण जाधव (भाजप), पवन मोटगी (आम आदमी), तवणाप्पा नानासाहेब पाटील (अपक्ष), सुधा मनोहर भातकांडे (अपक्ष), संध्या सतीश पिरणुरकर (अपक्ष). प्रभाग क्र. 24 : गिरीश लक्ष्मण धोंगडी (भाजप), रोहिदास सुबकराव अंबले (अपक्ष), महेश केशव नाईक (अपक्ष). प्रभाग क्र. 25 : स्नेहल कोले (भाजप), तस्नीम खालिदायुम सिद्दकी (काँग्रेस), मेहबूब मिर्चीवाले (आम आदमी), जरीना फतेखान (अपक्ष), सरला हेरेकर (अपक्ष). प्रभाग क्र. 26 : रेखा मोहन हुगार (भाजप), शोभा अशोक सदलगी (काँग्रेस). प्रभाग क्र. 27 : अर्जुन देमट्टी (काँग्रेस), संदीप श्रीनिवास जाधव (भाजप), जमीर शेख (अपक्ष), नितीन पांडुरंग पेरणूरकर (अपक्ष), निखिल मासेकर (अपक्ष), रवी महादेव साळुंखे (अपक्ष), संजय भाकोजी (अपक्ष), संजय मल्लाप्पा शिंदे (अपक्ष) संजीव बाबू अनगोळकर (अपक्ष). प्रभाग क्र. 28 : रवी धोत्रे (भाजप), परशुराम वामन कांबळे (काँग्रेस), उमेश पुट्टा (अपक्ष), दीपक ईश्वर वाघेला (अपक्ष), नरसिंह दासनगार (अपक्ष), रवि केशव शिंदे (अपक्ष), श्रीकांत बाळकृष्ण कदम (अपक्ष), संतोष कोलकार (अपक्ष). प्रभाग क्र. 29 : नितीन नामदेव जाधव (भाजप), सीमा राजदीप कौजलगी (काँग्रेस), महेंद्र देसाई (आम आदमी), अजित लक्ष्मण उचगावकर (अपक्ष), ॲड. धनराज रानोजी गवळी (अपक्ष), सुनील महादेव बोकडे (अपक्ष), मनोज मनोहर कालकुंद्रीकर (अपक्ष) विनायक गोपाळ गुंजटकर (अपक्ष) संयोगिता सुधीर हलगेकर (अपक्ष).

प्रभाग क्र. 30 : अर्चना मेत्री (काँग्रेस), ब्रम्हानंद अर्जुन मिरजकर (भाजप) रामचंद्र हनुमंत सुतार (आम आदमी), राकेश गणपतराव कलघटगी (अपक्ष), दयानंद दीनानाथ कारेकर (अपक्ष), श्रीकांत पाटील (अपक्ष), राजश्री गवळी (अपक्ष). विजय चंदगडकर (अपक्ष). प्रभाग क्र. 31 वनीता गोंधळी (काँग्रेस), मीना श्रीशैल विजापुरे (भाजप), राखी शंकर हेगडे (आम आदमी), सोम्या संजय सुलाखे (अपक्ष), राजश्री नंदकुमार हावळ (अपक्ष). प्रभाग क्र. 32 : आनंदकुमार यमनप्पा बॅकुड (काँग्रेस), श्रीकांत शंकर राठोड (जेडीएस), संदीप अशोक बिरग्यार (भाजप), भालचंद्र चव्हाण (आम आदमी), आशुतोष कांबळे (अपक्ष), भारती राजेश तिरकन्नावर (अपक्ष), रमेश गुरुलिंग कडलास्कर (अपक्ष), व्ही. लोकेश (अपक्ष), विनायक दयानंद कांबळे (अपक्ष), सरिता प्रीतम शिपुरकर (अपक्ष). प्रभाग क्र. 33 : अनुश्री देशपांडे (काँग्रेस), रेश्मा प्रवीण पाटील (भाजप), गुलताज खान (आम आदमी), पुनम महादेव बेन्नाळकर (अपक्ष), वंदना मोहन बेळगुंदकर (अपक्ष). प्रभाग क्र. 34 इजाज गुलामहुसेन खान (काँग्रेस), श्रेयस काकडे (भाजप), श्वेता अगसिमनी (आम आदमी), इम्रान फत्तेखान (अपक्ष) नागराज हन्नूरकर (अपक्ष). प्रभाग क्र. 35 व्ही. पार्वती (काँग्रेस), प्रेमा राठोड (जेडीएस), लक्ष्मी राठोड (भाजप), ज्वाला पटेल (अपक्ष), भाग्या मुचांडे (अपक्ष), रुपा राजू ठोंबरे (अपक्ष), विद्या कोलकार (अपक्ष), शकुंतला कोलकार (अपक्ष). प्रभाग क्र. 36 : दिनेश मल्लिकार्जुन नाशिपुडी (काँग्रेस), राजशेखर मल्लिकार्जुन डोणी (भाजप), भरत अनगोळकर (आम आदमी), आर. अभिलाषा (उत्तम प्रजाकिय), पुष्पा संतोष पर्वतराव (अपक्ष), ज्योती राजशेखर भावीकट्टी (अपक्ष), मोहम्मद गौस निजामी (अपक्ष), संतोष पद्मन्नावर (अपक्ष). प्रभाग क्र. 37 : नीता भिसे (जेडीएस), शामोबीन पठाण (काँग्रेस), तस्बीहा नदाफ (आम आदमी), हिना कौसर दुकानदार (अपक्ष), रेणू अथणी (अपक्ष), भावी कस्तुरी (अपक्ष), कौसर शेख (अपक्ष) ज्योती हेद्दूरशेट्टी (अपक्ष), फिर्दोशी शेख (अपक्ष), लक्ष्मी धारवाड (अपक्ष), शाहिरा अत्तार (अपक्ष), सलिमाबी कबरट्टी (अपक्ष), सुरय्या टेंगीनकेरी (अपक्ष). प्रभाग क्र. 32 : मुक्तार इनामदार (जेडीएस), रंजीत कलाल (भाजप), अल्ताफ बाळेकुंद्री (आम आदमी), अब्दुल अजीम बाणदार (अपक्ष), राजू गोणे (अपक्ष), फईम नाईकवाडी (अपक्ष), मोहम्मद अजीज पटवेगार (अपक्ष).

प्रभाग क्र. 39 : उदयकुमार विठ्ठल उपरी (भाजप), बलराम महादेव संगोळ्ळी (काँग्रेस) मंजुनाथ बाबुराव बांदोळकर (आम आदमी), रवींद्र भगवान जाधव (अपक्ष) नेताजी मनगुतकर (अपक्ष), रंजन मरवे (अपक्ष). प्रभाग क्र. 40 रेश्मा बसवराज कामकर (भाजप), उमा श्रीनिवास ताळूकर (अपक्ष), जयश्री रमेश सोंटक्की (अपक्ष). प्रभाग क्र. 41 : मंगेश नारायण पवार (भाजप), महांतेश इराप्पा पाटील (काँग्रेस), दिपक वसंत जमखंडी (अपक्ष), आप्पासाहेब बाबुराव पुजारी (अपक्ष), प्रसाद जितेंद्र संकण्णावर (अपक्ष), रतन गोपाळ मासेकर (अपक्ष). प्रभाग क्र. 42 : अभिजीत जवळकर (भाजप), सोमशेखर देवाप्पा हिट्टणगी (काँग्रेस), इंद्रनील अणवेकर (अपक्ष), राकेश रघुनाथ पलंगे (अपक्ष), राजेश गणपती लोहार (अपक्ष), सचिन चंदगडकर (अपक्ष). प्रभाग क्र. 43 : अनिता बसवराज रेवण्णावर (काँग्रेस), वाणी विलास जोशी (भाजप), लता लाटकर (जेडीएस), जयशिला किरण सायनाक (अपक्ष). प्रभाग क्र. 44 : आनंद प्रभाकर चव्हाण (भाजप), प्रशांत रमेश सुतार (जेडीएस), चांगदेव मनोहर कुगजी (अपक्ष) जॉर्ज पाॅल मस्करेन्स (अपक्ष), पवन तुकाराम कांबळे (अपक्ष), पंढरी पुंडलिक परब (अपक्ष), राम परशुराम घोरपडे (अपक्ष), रेखा हन्निकेरी (अपक्ष), व्यंकटेश यशवंतराव शिंदे (अपक्ष). प्रभाग क्र. 45 : रूपा चिकलदिनी (भाजप), राजश्री नाईक (काँग्रेस), सुनिता सिद्धाप्पा केंप (अपक्ष), रेणुका गस्ती (अपक्ष), सुरेखा हालभावी (अपक्ष). प्रभाग क्र. 46 : रवी भद्रकाळी (काँग्रेस), हनुमंत कोंगाळी -कोगनळ्ळी (भाजप), बसवराज भावी (आम आदमी), अजितकुमार पाटील (अपक्ष) मीनाक्षी गलगली (अपक्ष) जी. सी. धर्मराज (अपक्ष), वर्षा मुरगूड (अपक्ष), शिवकुमार माळकण्णावर (अपक्ष), शिवानंद मल्लाप्पा मुगळीहाळ (अपक्ष), सुरेश यादव (अपक्ष). प्रभाग क्र. 47 : शोभा सुनील पाटील (भाजप), नंदा बसवराज कच्चू उर्फ नंदा महादेव अल्लूर (आम आदमी), अस्मिता भैरगौडा पाटील (अपक्ष), सुलोचना शिवाजी सुंठकर (अपक्ष). प्रभाग क्र. 48 : तुषार गड्डे (काँग्रेस), भुपाल अलकनुर (भाजप) बसवराज मोदगेकर (अपक्ष).

प्रभाग क्र. 49 : दिपाली संतोष टोपेगी (भाजप), रत्ना मल्लीकर्जून हरणी (काँग्रेस), रुकसाना नासिर खेडेकर (एमआयएम), वर्षा विनोद आजरेकर (अपक्ष), जयश्री श्रीकांत कलघटगी (अपक्ष), नागवेणी संजय सव्वाशेरी (अपक्ष), साधना सागर पाटील (अपक्ष), माधुरी स्वप्नील जाधव (अपक्ष), मंगल तारळेकर (अपक्ष). प्रभाग क्र. 50 : सारिका पाटील (भाजप), राधा तिम्मानी पारिश्वाड (काँग्रेस), नेत्रा मनोहर मणसे (अपक्ष), शिवानी उमेश पाटील (अपक्ष), सरिता मनोहर बाळेकुंद्री (अपक्ष), गीता मनोहर हलगेकर (अपक्ष). प्रभाग क्र. 51 : श्रीशैल शिवाजी कांबळे (भाजप), संजीव बाबुराव वाजंत्री (काँग्रेस), हरीश वसंत वाजंत्री (जनता दल), कल्लाप्पा व्हनाप्पा चरगडवर (अपक्ष), मदन मार्तंड मॅलीनमनी (अपक्ष), मारुती अर्जुन धम्मणगी (अपक्ष), श्रुती विनायक पाटील (अपक्ष), सदानंद रामचंद्र मेत्री (अपक्ष). प्रभाग क्र. 52 : रेणुका कुरिहाळकर (भाजप), खुर्शिद दादापीर मुल्ला (काँग्रेस), सायली गुंजटकर (अपक्ष) प्रभाग क्र. 53 : रमेश मॅलिगोळ (भाजप), रामा चिकलदिनी (अपक्ष), पुंडलिक तळवार (अपक्ष), सागर दिवाटगी (अपक्ष), विजय नाईक (अपक्ष), संजीव पुजारी (अपक्ष), शिवाजी बळप्पा कुप्पण्णावर (अपक्ष). प्रभाग क्र. 54 : अनुसया बसवराज भावी (जनता दल), माधवी राघोचे (भाजप), पूजा काकतकर (आम आदमी), किरण आजगावकर (अपक्ष), अरुणा कुट्रे (अपक्ष), सुरेखा कोरीशेट्टी (अपक्ष), श्रद्धा पाटणेकर (अपक्ष), पूजा लमानी (अपक्ष), ज्योती हुलबत्ते (अपक्ष). प्रभाग क्र. 55 : सविता पाटील (भाजप), सोनल सुंठकर (काँग्रेस), अश्विनी कटांबळे (अपक्ष), शिवगंगा केंप (अपक्ष), गंगव्वा दड्डी (अपक्ष). प्रभाग क्र. 56 : शीतल सतीश खंन्नूकर (भाजप), लक्ष्मी राघवेंद्र लोकरी, मधुश्री आप्पासाहेब पुजारी (अपक्ष), शीला तुकाराम होसुरकर (अपक्ष). प्रभाग क्र. 57 : यशोदा अशोक बजंत्री (काँग्रेस), शोभा सोमनाचे (भाजप), संध्या पवार (अपक्ष). प्रभाग क्र. 58 : मालाश्री कडोलकर (काँग्रेस), रोहिणी कांबळे (जनता दल), प्रिया सागौड (भाजप), जयश्री कडकोळ (अपक्ष), रश्‍मी काकतकर (अपक्ष), सुजाता नरसगौड (अपक्ष), सारिका बोबाटे (अपक्ष), रेखा लक्ष्मीकांत नाईक (अपक्ष), अनिता सातेरी अपक्ष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.