बाळा हे कोण? असा प्रश्न विचारल्यावर शिवाजी महाराज असे बोबड्या शब्दात सांगणाऱ्या एक चिमुकलीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
लहानश्या वयात ही चिमुरडी कौतुकास पात्र ठरली होती. आता तर तिने कमालच केली असून अवघ्या दीड वर्षात तिच्या नावावर तीन रेकॉर्ड आहेत.
अर्थात वेगवेगळ्या तीन रेकॉर्ड बुकमध्ये तिची नोंद झाली आहे.
ही चिमुकली आपल्या बेळगावच्या मच्छे येथील आहे.ऋत्वि गजानन जैनोजी हे तिचे नाव.वडील गजानन हे क्रिकेटपटू तर आजोबा कृष्णा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी या कन्येला घडवले असून तिच्यातील स्पार्क वेळीच ओळखला आहे.
ती या बालवयातच 151 गोष्टी ओळखते.चित्रे, फळे, भाज्या यांची नावे, पक्षी,प्राणी व क्रीडाप्रकार,क्रिकेटपटू, स्वातंत्र्यवीर, वाहने, शरीराचे अवयव, अन्न पदार्थ आणि घरातील वस्तूंची नावे तिला ओळखता येतात.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, कर्नाटक आचिव्हर बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि स्टार फॉरेव्हर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तिची नोंद झाली असून ती कौतुकास पात्र ठरली आहे.