संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी या प्रा.आनंद मेणसे यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.सामाजिक कार्यकर्त्या डॉ.मेधा पुरव सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला.
ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत कुमार केतकर यांच्यासह अनेक मान्यवर ऑन लाईन द्वारे प्रकाशन समारंभात सहभागी झाले होते.कुमार केतकर यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले.
पुणे येथील दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला.
गेली सहा दशकाहून अधिक काळ मराठी भाषिकांनी सीमा प्रश्नाचा लढा चालवला आहे.देशात चाललेला हा सगळ्यात दीर्घ लढा आहे.मराठी भाषिक लोकशाहीसाठी हा लढा देत आहेत.हा लढा अहिंसक मार्गाने चाललेला आहे.मराठी भाषिकांची लोकेच्छा ध्यानात घेवून सीमाभागातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात केंद्र सरकारने विलीन करावा असे विचार पुस्तकाचे लेखक प्रा.आनंद मेणसे यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले.
संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी या प्रा.आनंद मेणसे यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर लिहिलेल्या पुस्तकाचे ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत कुमार केतकर यांनी कौतुक केले.कोणत्या तरी विद्यापीठाने या पुस्तकाला पी एच डी जाहीर करावी असे आवाहन केतकर यांनी केले.
पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला ऑन लाईन द्वारे कामगार नेते भालचंद्र कानगो,निवृत्त सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर यांच्यासह अनेक व्यक्तींनी सहभाग दर्शविला होता
अजय सातेरी,बाळासाहेब पिसाळ,वृषाली मगदूम ,अंजली पाटील,सुरेश धोपेश्र्वरकर आदी प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.