Thursday, December 12, 2024

/

मनपा निवडणुकीसाठी 385 उमेदवार रिंगणा आहेत.

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेच्या येत्या 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी तब्बल 385 उमेदवार रिंगणात असून यामध्ये काँग्रेसच्या 45 आणि भाजपच्या 55 उमेदवारांचा समावेश आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वाधिक 19 उमेदवार आणि त्या खालोखाल प्रभाग क्रमांक 37 मध्ये 13 उमेदवार उभे आहेत. त्याचप्रमाणे सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी दोन उमेदवार प्रभाग क्र. 21 व 26 मधून निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक रिंगणातील एकूण 385 उमेदवारांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 45, भारतीय जनता पक्षाच्या 55, निधर्मी जनता दलाच्या 11, आप 27, उत्तम प्रजाकिय पक्ष 1, एआयएमआयएम 7, एसडीपीआय 1 आणि अपक्ष 238 उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीचे मतदान येत्या 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे.

कोणत्या वार्डात कश्या आहेत लढती पहा खालील तक्ता

 

Link to PDF file

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.