प्राणघातक शस्त्राने वार करून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज रविवारी भल्या पहाटे गोकाक येथे उघडकीस आली आहे.
मंजू शंकर मुर्कीभावी (वय 22) असे खून झालेल्या युवकाचे नांव आहे. मंजू हा एका गॅरेजमध्ये काम आला होता. गोकाक येथील महांतेशनगर येथे काल रात्री प्राणघातक शस्त्राने मंजूचा निघृण खून करून मारेकरी फरार झाले.
आज भल्या पहाटे हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली. खुनाचे निश्चित कारण समजू शकले नाही.
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीसह पंचनामा केला. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.