कोविड सोबत पुराची परिस्थितीचा सामना राज्याला करावा लागत आहे अश्या अवस्थेत जिल्हा प्रशासनाने संयम राखून काम करण्याची गरज आहे.आर्थिक आणि कोणतीही अडचण असल्यास अधिकाऱ्यांनी संबंधितांना कल्पना देत समस्या सोडवून घ्याव्यात अश्या सूचना मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी दिल्या.
बेळगाव जिल्ह्यातील मंत्री आमदार अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या आठवडा भर पाऊस होत आहे त्यामुळे सगळीकडे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे अधिकारी महाराष्ट्राच्या संपर्कात आहेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीवर नजर ठेऊन आहेत.आगामी दोन दिवसांत पाऊस वाढला तरी सरकार येणाऱ्या पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील वर्षी पुरात नुकसान झालेल्या घरांची थकीत नुकसानभरपाई देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत बेळगाव जिल्ह्यातील 113 गावात पुराची स्थिती असून 89 आश्रय केंद्रे निर्माण करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री आर अशोक यांनी औषध आणि एन डी आर एफ ला निधी वाढवून देण्याची मागणी केली.बेळगाव विभागात 1400 की मी रस्त्यांचे 305 ब्रिजचे मिळून 1200 कोटींचे नुकसान झाले असून तात्काळ दुरुस्तीसाठी 170 कोटी मंजूर करा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली.
बेळगाव शहरात अनेक ठिकाणी नाल्यांच्या निर्मितीची गरज असून शासनाने यासाठी अनुदान ध्यावे अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी या बैठकीत केली.