बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कर्नाटकातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नव्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून प्रामुख्याने खालील नांवे चर्चेत आहेत.
बी. एस. येडीयुरप्पा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. नव्या मुख्यमंत्री पदासाठी परिवहन मंत्री व उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी भाजप राष्ट्रीय संघटन महामंत्री आरएसएसचे बी. एल. संतोष आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नावांचा भाजप हायकमांड करून विचार केला जात आहे. याव्यतिरिक्त मुधोळ बागलकोट जिल्ह्याचे मुरुगेश निराणी, अरविंद बेल्लद व बसवराज बोम्मई या नावांची देखील चर्चा आहे.
केंद्रातील मोदी सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या प्रल्हाद जोशी यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असली तरी जोशींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार की राज्यातील नेत्यांकडे राज्याची सूत्रे राहणार हे उध्या पर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
उत्तर कर्नाटकचे (धारवाड) खासदार असणाऱ्या जोशी यांच्यानंतर भाजप राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्या नांवाची चर्चा आहे. ते कुशल प्रशासक म्हणून सुपरिचित आहेत. याखेरीज उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे नांवही चर्चेत आहे. या सर्वांमध्ये मुख्यमंत्री कोण बनणार? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.