Thursday, January 23, 2025

/

लसींसाठी रांगांचे दृश्य कायम…

 belgaum

बेळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा पुन्हा जाणवत असल्याने मोजक्या लोकांनाच लस मिळत आहे.गेल्या आठवडा भरापासून बेळगाव शहरासह तालुक्यातील आरोग्य केंद्रात अशीच परिस्थिती बनली आहे.

बिस्म इस्पितळातील लसीकरण केंद्रासमोरदेखील लस घेण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. तरीही लस मिळत नसल्याने नागरिकांची विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

बेळगाव बीम्ससमोर घेण्यासाठी रोज लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांचीही भर पडत आहे. दहावीची परीक्षा होणार असल्याने आणि शाळा कॉलेज सुरू होण्याच्या शक्यतेने लशीसाठी विद्यार्थी येथे येत आहेत. लस घेतल्यासच परीक्षेला आणि शाळा-कॉलेजात प्रवेश देण्यात येईल अशी अट घालण्यात आली आहे .

मात्र लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरनाविच विन्मुख घेऊन विद्यार्थ्यांना परतावे लागत आहे. सध्या बीम्स मध्ये पहिला डोस घेणाऱ्यांना लस देणे बंद आहे केवळ 150 जणांनाच लस देण्यात येत आहे असे बीम्स प्रशासनाने सांगितले आहे .लस घेण्यासाठी लोक पहाटे 5 वाजल्यापासूनच रांगा लावत आहेत .मात्र सकाळी 11 नंतर पहिला डोस घेणाऱ्यांना लस दिली जाणार नाही असे सांगण्यात येत आहे .त्यामुळे तासनतास रांग लावून उभारलेल्या विद्यार्थ्यांची ,नागरिकांची गैरसोय होत आहे .त्यामुळे नाराज झालेले लोक प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधीच्या नावाने बोटे मोडीत विन्मुख होऊन माघारी परतत आहे.

महाविद्यालयात लसीकरण सतीचे केले आहे. त्यामुळे पहिला डोस घेतल्या पाहिजेत .मात्र येथे लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे .लस घेतली नाही तर कॉलेजला प्रवेश नाही. त्यामुळे एकीकडे शिक्षणही नाही अन दुसरीकडे लस नाही अशा दुविधेत सापडलो आहे. सरकारने कॉलेजमध्येच लसीकरणाची व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांची अशी ओढाताण होणार नाही लसीकरण करून घ्यायला आलेल्या विध्यार्थ्यांने सांगितले.

सहा दिवस धडक पडल्यानंतर आता कुठे पतील लशीचा दुसरा डोस मिळाला आहे. पण मला अजून पहिला डोस मिळालेला नाही. असे झाल्यास काय करायचे ?एक तर घ्या म्हणून सांगतात अन लशीसाठी येथे आल्यावर लसच उपलब्ध नाही म्हणून सांगतात हा कसला न्याय ?असा सवाल एका महिलेने केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.