केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री तावरचंद गेहलोत यांची कर्नाटक राज्याच्या नूतन राज्यपाल पदी नियुक्ती करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
सध्याचे राज्यपाल वजुभाई वाला यांचा अवधी संपला आहे त्यामुळे गेहलोत यांची नूतन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाणार आहे त्यात गेहलोत यांचे मंत्री पद जाणार असून त्यांना कर्नाटकचे राज्यपाल बनवले जाणार आहे.
मध्य प्रदेश विधानसभेत तीन वेळा आमदारपद तर लोकसभेचे चार वेळा खासदार पद त्यांनी भूषवले असून सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत. मंत्रिमंडळ विस्तारवेळी 8 राज्यांच्या राज्यपालांची देखील नियुक्ती केली जाणार आहे.