वरिष्ठ पोलीस अधिकारी मैसूरु लोकायुक्त एस पी स्नेहा पी व्ही यांची बेळगाव डी सी पी क्राईम पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याचे पोलीस उपायुक्त बसवराज निलगार हे 31 जुलै रोजी सेवा निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागी स्नेहा पी व्ही यांची नियुक्ती झाली आहे.
स्नेहा पी व्ही यांनी या अगोदर मैसूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. मैसूरू अतिरिक्त पोलीस प्रमुख,सकलेशपूर आणि चांमराजनगर येथे डी वाय एस पी म्हणून तर के पी ए मैसूरू सहाययक निर्देशक पदी नियुक्ती झाली होती.
बेळगावचे कायदा सुव्यवस्था डी सी पी विक्रम आमटे यांच्या सोबत स्नेहा पी व्ही या क्राईम डी सी पी म्हणून कार्य करणार आहेत.