राज्य प्रथमच राज्य पोलीस विभागात “सीन ऑफ क्राईम ऑफिसर” अर्थात अपराध स्थळ निरीक्षण अधिकारी नांवाने नवीन पद निर्माण करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
वैज्ञानिक दृष्ट्या गुन्ह्याचे दृष्य तपासून तेथील सर्व प्रकारचे पुरावे संग्रहित करून गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गुन्हा स्थळ निरीक्षण अधिकारी सहकार्य करतील, त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 26 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
एखाद्या गुन्ह्यात आतापर्यंत स्थानिक अधिकारी पुरावे गोळा करण्याचे काम करीत होते. गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात यापुढे अपराध स्थळ निरीक्षण अधिकाऱ्यांचे पथक सर्वप्रथम गुन्हा घडलेल्या स्थळाला भेट देईल. तेथील सर्व पुराव्यांचा संग्रह करून ते विधिविज्ञान प्रयोग शाळेला सुरक्षित पाठवून देण्यासाठी तपास अधिकार्यांकडे स्वाधीन करणे यासह इतर आवश्यक कर्तव्य हे नूतन अधिकारी पार पाडणार आहेत.
गुन्ह्याचा लवकर शोध लावण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कर्तव्य हे अधिकारी पार पाडतील, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगलोर येथे बोलताना दिली. गुन्हेगारी प्रकरणांची त्वरित तपासणी करण्यासाठी अशा प्रकारची अधिकाऱ्यांची पदे देशात प्रथमच निर्माण करण्यात आली आहेत.