कर्नाटकात नेतृत्व बदलासंदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री यांनी नुकतेच एक विधान केले असून कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील कोविड परिस्थिती नियंत्रण आणि विकासकामांवर केंद्रीय नेतृत्व खूष असून सध्या नेतृत्व बदलाची कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले असून सध्या सुरु असलेल्या मुख्यमंत्री बदलासंदर्भात सुरु असलेल्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सदानंद गौडा मुख्यमंत्र्यांशी बोलताना पुढे म्हणाले कि, सध्या सुरु असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेत काही सत्य आहे, असे मला वाटत नाही. राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय नेते यासंदर्भात निर्णय घेतील. राज्यात उद्भवलेल्या कोविड परिस्थितीत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी घेतलेले निर्णय, कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजना, कर्नाटकातील अनेक विकासकामे यासर्व गोष्टींवर केंद्रीय नेते कर्नाटकातील नेतृत्वावर खूष आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मत सदानंद गौडा यांनी व्यक्त केले.
विविध लिंगायत समाजाच्यावतीने बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा सुरु आहेत, यासंदर्भातील प्रश्नावर खुलासा करताना सदानंद गौडा म्हणाले कि, या सर्व अफवा आहेत. जेव्हा कोणीही चांगले काम करतात, त्यावेळी लोक त्यांचे कौतुक करतात. परंतु विरोधक कधीच कौतुक करत नाहीत
. नलीनकुमार कटील यांच्या एका ध्वनिचित्रफितीसंदर्भात बोलताना ते म्हणाले कि, या सर्व अफवा आहेत, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि त्यांच्या शासनप्रणालीला राज्यातील नागरिकांचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्रीबद्दलची कोणतीही शक्यता वाटत नसल्याचे सदानंद गौडा यांनी स्पष्ट केले.