टिळकवाडी येथील आरपीडी रोडवर गेल्या दहा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या शोभेच्या दिव्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दुर्दशा झाली असून याठिकाणी स्मार्ट सिटी योजनेतून नवे दिवे बसवले जावेत, अशी मागणी केली जात आहे.
गेल्या दहा वर्षापूर्वी विश्व कन्नड साहित्य संमेलनाप्रसंगी शहरात विविध ठिकाणी शोभेचे दिवे बसविण्यात आले होते. त्यामध्ये आरपीडी रोडवरील शुभेच्या दिव्यांचाही समावेश होता. दशकभरात त्या शोभेच्या दिव्यांची दुर्दशा झाली असून ते नांवापुरतेच राहिले आहेत.
सध्या आरपीडी रोडचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पूर्वीचे शोभेचे दिवे बदलून त्या ठिकाणी नवे दिवे बसवले जावेत, अशी मागणी केली जात आहे.
या भागातील नागरिकांनी संबंधित अभियंते व स्मार्ट सिटीला याची माहिती दिली असली तरी अद्यापही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.