बेळगावच्या गोल्फ क्लब परिसरात बिबट्या दिसून आला असल्याची अफवा पसरली आणि सामान्य नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले, याचबरोबरीने वनविभागाला प्रचंड काम लागले होते, पण विभागाने सलग तीन दिवस रोज तपास करून अखेर या अफवे मागचे सत्य शोधून काढले आहे.
या भागात बिबट्या नाही तर रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचे पुरावे बेळगाव जिल्हा वन विभागाला उपलब्ध झाले आहेत. या संदर्भात वन विभागाने तीन ते चार ठिकाणी ट्रेक कॅमेरे बसविले होते.
त्या कॅमेरामध्ये चित्रित झालेल्या नुसार बिबट्या नसून ते रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. डीसीएफ हर्षा बानू, आनंद मगदूम आणि नागराज भीमगोळा यांच्या पथकाने तपास घेण्याचा प्रयत्न केला असता या भागात बिबट्या नसून रान मांजर असल्याचे स्पष्ट झाले आहे .
काही नागरिक या भागात मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांना तेथे बिबट्या असल्याचे दिसून आले.
मात्र हा आभास होता, त्यांनी काही व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सगळीकडे दहशत निर्माण झाली, ती दहशत निवारण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आणि शोधाशोध सुरू करण्यात आली दरम्यान आता पडदा पडला असल्याचे वन विभागाने म्हटले आहे.