जनहितार्थ बेळगाव उत्तर मतदार संघासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या 1 लाख डोसांचा पुरवठा केला जावा, अशी मागणी या मतदारसंघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.
बेळगाव बिम्सला आणखीन पंचवीस लाख रुपये मंजूर करावी अशी मागणी देखील त्यांनी येडीयुरप्पा यांच्याकडे केली आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी बिम्सला 25 लाख दिले आहेत त्यावर आणखी पंचवीस लाख रुपये देणार असे आश्वासन दिले.
गेल्या एक -दोन आठवड्यापासून बेळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जनहितार्थ बेळगाव उत्तर मतदार संघासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या 1 लाख डोसांचा पुरवठा केला जावा.
तसेच लसीकरणाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वटंमुरी प्राथमिक आरोग्य केंद्राला आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र हा बहुमान दिला जावा, अशी मागणी देखील बेनके यांनी केली असून तशा आशयाचे निवेदन आज शनिवारी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री डी. सुधाकर यांना सादर केले.
निवेदनाचा स्वीकार करून आरोग्यमंत्र्यांनी लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.