कर्नाटक राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी झाल्या नंतर राज्य सरकारने निर्बंध आणखी शिथिल केले आहेत.कोविड नियंत्रण तांत्रिक समितीच्या शिफारसी नुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 5 जुलै सकाळी पाच वाजल्या पासून 19 जुलै सकाळी पाच वाजे पर्यंत अनलॉक असा असणार आहे.
सरकारी आणि खाजगी कार्यालये उद्योगव्यापार 100 टक्के क्षमता कर्मचाऱ्यांनी सुरू करण्याची परवांनगी देण्यात आली आहे.
मॉल सुरू करण्यास अनुमती तर मेट्रो सह बस सेवा जनतेसाठी 100 टक्के क्षमतेने सुरू असेल, धार्मिक स्थळांना दर्शनासाठी खुले करण्यात येतील. लग्न आणि इतर घरघुती कार्यक्रमात 100 जणांना सहभागी होण्याची अनुमती,खेळाडूंना , जलतरण पटूना सराव करण्यासाठी मैदानाचा वापर करण्याची परवानगी,अंतिम संस्कारला 20 जण सहभागी होण्याची अनुमती,
5 जुलै ते 19 जुलै दरम्यान वीकेंड कर्फ्यु नसेल मात्र रात्री 9ते पहाटे पाच दरम्यान नाईट कर्फ्यु असेल.
सामाजिक राजकीय आणि धार्मिक सभा साठी परवानगी नसेल आंदोलन करण्यास देखील परवानगी नाही.
शिक्षण संस्थांनी आपापल्या परीने निर्णय घ्यायचा आहे पब चालू करण्यास मनाई असेल.सिनेमा गृह चालू करण्यास बंदी असेल
प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पाहून सदर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संबंधित पालक मंत्र्यांशी चर्चा करून आणखी कडक निर्बंध करू शकतात अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जनतेने मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.