बेळगाव शहरात सब रजिस्ट्रार कार्यालयात होणारी गर्दी पहाता दोन नोंदणी कार्यालये होणार आहेत.2020 मध्ये महसूल खात्याने बजावलेल्या नवीन आदेशानुसार बेळगाव दक्षिण मतदारसंघात आणखी एक सब रजिस्ट्रार कार्यालय सुरू करण्याचा आदेश बजावला आहे.
बहुसंख्य शासकीय कार्यालये बेळगाव शहरातील उत्तर भागांत आहेत त्यात मुख्य सब रजिस्ट्रार देखील उत्तर भागांत आहे या कार्यालयात मोठी गर्दी होत आहे अनेकजण रांगेत उभे रहात आहेत याठिकाणी नोंदणीसाठी आलेल्या लोकांना बैठकीची देखील सोय नाही त्यासाठी आणखी एका नवीन कार्यालयास अनुमती देण्यात आली आहे.
दुसऱ्या सब रजिस्ट्रार कार्यालयासाठी जागा गोवावेस जवळील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये निश्चित करण्यात आली आहे.या कॉम्प्लेक्समध्ये 3 हजार चौरस फूट जागा कार्यालयासाठी आरक्षित करण्यात आली आहे.
आगामी आगष्ट महिन्यात सब रजिस्ट्रार दक्षिण भागातील गोवावेस मध्ये स्थलांतर होऊ शकते.बेळगावचे नोंदणी कार्यालय दक्षिण आणि उत्तर असा विभागला आहे यासाठी कोणत्या विभागात कोणते गाव जागा यासाठी अंतिम परवानगी घेतली जाणार आहे.
बेळगाव दक्षिण विभागात 224 जागा तर उत्तर मध्ये 189 विभाग ठरवण्यात आले आहेत.
बेळगाव दक्षिण विभाग
बेळगाव दक्षिण मतदारसंघ, अलारवाड,अनगोळ, शहापूर, वडगांव, टिळकवाडी,खासबाग,होसुर,मंडोळी,अरळीकट्टी,बडस,बागेवाडी,बस्तवाड,बेळगुंदी,बिजगरणी, बोकनूर,कर्ले,किणये,कोंडूसकोप्प, कुद्रेमानी, मच्छे,मारिहाळ, मुतगा,मूतनाळ,नावगे,नंदीहळळी, पिरनवाडी,राजहंसगड,सुळगे ,सावगाव,
संतीबस्तवाड,यरमाळ,येळ्ळूर, झाड शहापूर,
उत्तर बेळगाव विभाग
उत्तर बेळगाव मतदार संघ,मध्य बेळगाव,काकती,अगसगा,अलतगा,बाळेकुंद्री,बेनकनहळळी, भूतरामहट्टी, गोजगे,गौन्डवाड, हालभावी,कडोली,कणबर्गी,कंग्राळी खुर्द,कंग्राळी बी के,मन्नुर,नागेनहट्टी, सांबरा, सुतगट्टी तुरमुरी उचगाव,
(वरील यादी संपूर्ण नाही यात बदल होऊ शकतो)