Saturday, January 18, 2025

/

नव्याने आढळले 106 रुग्ण : 6 जणांचा मृत्यू

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात नव्याने 106 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आज शनिवारी आणखी 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 819 झाली आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 2020 इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 106 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे आज शनिवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 76,893 इतकी झाली आहे. बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज शनिवार दि. 10 जुलै 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 9,91,331 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले.

जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 48,610 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 2020 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 61584 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 8,79,117 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 9,90,239 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 76,893 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज शनिवारी नव्याने आढळलेल्या 106 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 9,06,149 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 2020 आहेत. त्याचप्रमाणे 2902 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या एकुण 819 झाली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून 74,054 रुग्ण मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आज शनिवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 38, चिकोडी 41, सौंदत्ती 2, खानापूर 2, अथणी 6, गोकाक 4, बैलहोंगल 3, हुक्केरी 7, रामदुर्ग 1 आणि इतर 2 अशा एकुण 106 रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.