Monday, January 13, 2025

/

लग्नसमारंभात कोरोना नियमाचे उल्लंघन दंड वसूल

 belgaum

अनलॉक झाल्यावर लग्नसमारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल महापालिकेने पहिलीच कारवाई केली. कणबर्गी तील शांती गार्डन मधील लग्न समारंभावर धडक कारवाई करून 2500 रुपये दंड वसूल केला.

लग्नसमारंभासाठी 100 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे ,पण त्याच ठिकाणी 100 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते .शिवाय ,तिथे सोशल डिस्टन्स चे पालनही करण्यात आले नव्हते.

शांती गार्डन येथे सुरू असलेल्या या लग्न समारंभाची माहिती महापालिकेला मिळवल्यानंतर पर्यावरण अभियंते आदिलखान, आरोग्य निरीक्षक पुंडलिक लमानी यांनी लग्नसमारंभासाठी परवानगी घेतली आहे का ,याची पडताळणी केली.

शहरातील लग्नसमारंभांना आधी महापालिकेकडून परवानगी दिली जात होती ,पण एप्रिलमध्ये ती जबाबदारी तहसीलदारांकडे देण्यात आली आहे.

लग्नसमारंभासाठी परवानगी देताना तेथे कमाल 100 जण उपस्थित राहायला हवेत, अशी अट घातली जाते ,पण त्या अटीचे पालन झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे 2500 रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले .दंडाची रक्कम वसूल करुन त्याची रितसर पावतीही देण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.