एकीकडे बेळगाव मनपा समोर फडकत असलेला लाल पिवळ्या ध्वजा बाबत कानडी संघटना मनपा समोर धिंगाणा घालत असताना दुसरीकडे विधान परिषदेचे मुख्य सचतेक आमदार महंतेश कवटगिमठ यांनी या ध्वजा बाबत वक्तव्य केले आहे.
काल सोमवारी कानडी संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत जुना ध्वज बदला आणि नवीन ध्वज घाला अशी मागणी केली होती त्या शिवाय कस्तुरी नावाच्या एका महिलेने देखील याच मागणीसाठी मनपासमोर धिंगाणा घातला होता.
बेळगाव महापालिकेसमोर असणारा लाल पिवळा ध्वज बदलून त्या ठिकाणी नवीन ध्वज लावण्यासंदर्भात बोलताना त्यांनी याबाबत गृहमंत्री, कन्नड संस्कृती खात आणि नगर विकास खात्याच्या मंत्र्यांसमवेत मी चर्चा करून नवा ध्वज लावण्याचा प्रयत्न करेन असे कवटगीमठ यांनी म्हटले आहे.
याशिवाय बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याची मागणी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
बेळगाव येथे आज मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना कवटगीमठ यांनी उपरोक्त माहिती दिली. सध्या होत असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संभाव्य पूर परिस्थिती या दोन्हीच्या पार्श्वभुमीवर बेळगावात हिवाळी अधिवेशन होणे गरजेचे असून आपण यासंदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही महांतेश कवटगीमठ यांनी स्पष्ट केले.